भूलथापा देणाऱ्या लोकप्रतिनिधीना गावबंदी करा: संदीप देशपांडे

● झरी तालुक्यातील हजारो आदिवासी तरुण व माता भगिनींनी धरला मनसेचा झेंडा

जितेंद्र कोठारी, झरी: विकासाच्या नावावर भूलथापा देणाऱ्या आणि भूमिपुत्रांना त्यांच्या रोजगाराचा संवैधानिक हक्क नाकारणार्‍या लोकप्रतिनिधींना आता गाव बंदी करा, असे आवाहन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केले. झरी जामणी येथे मंगळवार 16 नोव्हेंबरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महापक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. या कार्यक्रमात झरी तालुक्यातील तब्बल 60 गावातील हजारों युवक तथा महिला भगिनींनी मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या कार्यावर विश्वास दाखवत मनसे पक्ष प्रवेश करीत मनसेचा झेंडा हाती घेतला.

स्वातंत्र्याच्या तब्बल 74 वर्षानंतर देखील तालुक्यातील आदिवासी बांधवांना रस्ता, वीज, पाणी, शिक्षण रोजगार व इतर मूलभूत गरजांसाठी ताटकळत राहावे लागत आहे. या भागातील लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीच्या वेळी भोळ्याभाबड्या आदिवासी नागरिकांना आश्वासन देऊन फसवणूक करीत आहे. असा आरोप मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी यावेळी केला. झरी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरयांच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना आता सत्तेच्या खुर्चीवरून खेचून काढल्याशिवाय पर्याय नाही. यासाठीची आदिवासी बांधवांनो विकासाची मशाल आपण स्वतः हाती घ्या. असे आवाहन मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना केले. 

झरी शहरातील शासकीय विश्राम गृहा समोरील भव्य पटांगणावर आयोजित सोहळ्याला मनसेचे सरचिटणीस व प्रवक्ता संदीप देशपांडे, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, उपाध्यक्ष आनंद एंबडवार, मनसेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत गीड्डे, वाशीम जिल्हाध्यक्ष मनीष डांगे,जेष्ठ पत्रकार विरेंद्र सिंह
जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ संतोष रोगे, संगीताताई कोडापे, नगरपरिषद वणीचे माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, मनसे झरी तालुकाध्यक्ष गजानन मिलमिले, झरी तालुका उपाध्यक्ष जीवन तोडसाम…

वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, वणी तालुका उपाध्यक्ष प्रविण डाहूले, वणी शहराध्यक्ष शिवराज पेचे, वणी शहर उपाध्यक्ष गीतेश वैद्य, मनसे रुग्ण सेवा केंद्र कार्याध्यक्ष आजीद शेख, मारेगाव तालुका अध्यक्ष रमेश सोनुले, मारेगाव शहराध्यक्ष नबी शेख, मारेगाव महिला शाखा तालुकाध्यक्ष आरती राठोड, मारेगाव शहर महिलाध्यक्ष सिंधुताई बेसकर, राळेगाव तालुका अध्यक्ष शंकर वरघट तसेच वणी विधानसभा क्षेत्रातील मनसेचे पदाधिकारी मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झरी तालुका अध्यक्ष गजानन मिलमीले यांचेसह उपाध्यक्ष जिवन तोडसाम व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.