विषबाधेने पीडित शेतकरी शेतमजुरांची आढावा बैठक
विषबाधेने मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीना चेक वाटप
राजू कांबळे, झरी: विषबाधेने पीडित शेतकरी शेतमजुरांची झरीमध्ये आढावा बैठक पार पडली. वसंतराव नाईक स्वावलंबी मिशन दौ-या अंतर्गत ही बैठक झरीतील तहसिल कार्यालयात पार पडली. दुपारी 2 वाजता झालेली ही बैठक किशोर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यात कर्मचा-यांना फवारणीबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. तसंच फवारणी दरम्यान मृत्यू झालेल्या शेतक-यांच्या पत्नीला 2 लाखांच्या मदतीच्या चेकचे देखील वाटप करण्यात आले.
झरी तालुक्यात फवारणी दरम्यान विषबाधा होऊन तिघांचा मृत्यु झाला तसंच 60 ते 70 नागरिकांना फवारणीची बाधा झाली. असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी शेतकरी स्वावलंबन मिशन दौ-या अंतर्गत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शेतकरी बांधवानी फवारणी करताना काय काळजी घ्यायला हवी या सदर्भात कृषि विभागातील सर्व कर्मचारी यांना माहिती देण्यात आली. या सर्व कर्मचाऱ्यांनी ही सपूर्ण माहिती गावातील शेतकरी शेतमजुर यांना समजावून सागावी असे त्यांना सांगण्यात आले.
यावेळी फवारणी विषबाधेने मृत्यु झालेल्या निमणी येथील शेतमजुर कैलास पेंदोर व दिग्रस येथील मधुकर बावने यांच्या पत्नीना प्रत्येकी 2 लाखाचा चेक देण्यात आले. तसंच पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये या साठी सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांना विविध मार्गातून जनजागृती करण्याचे कार्य करावे असा आदेश देण्यात आाला.
या आढावा सभेचे अध्यक्ष किशोर तिवारी हे होते. यावेळी वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीवरेडी बोदकुलवार तसेच पांढरकवडा येथील कृषि अधिकारी राहुल सातपुते, झरीचे तहसीलदार राऊत, गटविकास अधिकारी चव्हाण, पं.स. सभापति लताताई आत्राम, उपसभापति नागोराव उर्वते तसेच सर्व तलाठी, ग्रामसेवक, कृषिसेवक, कोतवाल, सरपंच, व इतर कर्मचारी तसेच अनेक नागरीक उपस्थित होते.
(आपल्या जवळ असणा-या न्यूज किंवा पब्लिश झालेल्या न्यूज संबंधी संपर्क साधू शकता, निकेश जिलठे- संपादक, वणी बहुगुणी 9096133400)