झरी तालुक्यातील 55 ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

नामप्रसाठी 8 तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 17 ग्रामपंचायत राखीव

0

सुशील ओझा, झरी: तालु्क्यातील 55 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आज दिनांक 2 फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आरक्षण काढण्यात आले. यात नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी + इतर जाती) 8 तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 17 ग्रामपंचायत राखीव निघाल्या आहेत. तर 2 अनुसुचित जातीसाठी व 28 अनुसुचीत जमातीसाठीचे आधीच राखीव असलेल्या जागांचे आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. सदर आरक्षण तहसीलदार गिरीष जोशी, नायब तहसिलदार रामचंद्र खिरेकर, नायब तहसिलदार मत्ते, नायब तहसिलदार गोलर यांच्या प्रमुख उपस्थितीत एका बालकाच्या हस्ते काढण्यात आले.

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी + इतर जाती) पांढरकवडा (ल), पिवरडोल, कमळवेल्ली, दुर्भा, मांगली, पिंपरड, लिंगटी, एडशी अशा 8 ग्रामपंचायती राखीव झाल्या आहेत. तर सर्वसाधारण गटासाठी सुर्दापूर, टाकळी, बोपापूर, अहेरअल्ली, खडकी, वठोली, एदलापूर, राजूर (गोटा), दरा, हिरापूर, पाटण, सतपल्ली, अडेगाव, वेडद, कोसारा, भेंडाळा, खातेरा अशा 17 ग्रामपंचायती निघाल्या आहेत.

अनुसुचित जातीसाठी मुकुटबन, सिंधीवाढोना तर अनुसुचित जमातीसाठी अर्धवन, धानोरा, दिग्रस, बंदीवाढोणा, मुळगव्हाण, कारेगाव, सुसरी, गव्हारा, निंबादेवी, मांडवी, दाभाडी, मांडवा, चिंचघाट, झमकोला, सुर्ला, चिखलडोह, मार्की (बु), मांगुर्ला (बु) पांढरवाणी, निमणी, अडकोली, दाभा, शिबला, जामणी, हिवरा बारसा, माथार्जून, खरबडा, उमरी अशा एकूण 30 ग्रामपंचायतीचे आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे.

सर्वसाधारण गटातील ग्रामपंचायतीतील महिला राखीव गटाचे आरक्षण यवतमाळ येथे गुरुवारी 4 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. आरक्षण काढते वेळी तहसिल कार्यालयात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

हे देखील वाचा:

वणी तालुक्यातील 101 ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

 

मारेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

Leave A Reply

Your email address will not be published.