कॉलेजला जातो म्हणून घरून निघाली, आणि घरीच नाही परतली

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातील आपल्या काकाकडे राहणारी अल्वपयीन मुलगी घरून निघून गेली, या प्रकरणी अज्ञान आरोपीविरोधात फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

अल्पवयीन मुलगी आपल्या काकाच्या घरी शिक्षणानिमित्त आली होती. ती 12 व्या वर्गात शिकते. तिचे आईवडील दुस-या जिल्ह्यात राहतात. गावी 10 वी झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी तिच्या आईवडीलांनी तिला तिच्या काकाच्या घरी पाठवले. 

सोमवारी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी ती सकाळी 8 वाजताच्या सुमारास कॉलेजच्या गणवेशात कॉलेज बॅग घेऊन कॉलेजला जातो अशी सांगून ती  घरून निघून गेली. मात्र रोजच्या वेळेवर ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या काकाने तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेही आढळून आली नाही. दरम्यान जवळचे नातेवाईक व तिच्या मैत्रिणीकडे विचारणा केली असता त्यांच्याकडूनही तिच्याबाबत कोणताही माहिती त्यांना मिळाली नाही. 

कुणीतरी त्यांच्या पुतणीला फूस लावून पळवल्याचा त्यांना संशय आला. यावरून त्यांनी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुलीचा शोध सुरू आहे. 

हे देखील वाचा:

वणी तालुक्यातील 101 ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

Leave A Reply

Your email address will not be published.