भास्कर राऊत, मारेगाव: जिल्हा परिषद शाळेमध्ये रंगवलेल्या चित्रांना विकृत रूप देण्याचा तसेच शाळेच्या भिंतीवर आक्षेपार्ह मॅसेज लिहून शाळेचे पावित्र भंग करण्याचा प्रकार घडकीस आला आहे. याबाबत गावात संताप व्यक्त केला जात असून अज्ञात आरोपी विरोधात मारेगाव पोलीस ठाणे तसेच पंचायत समितीमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून चोपण येथे जि. प. शाळा आहे. या शाळेला रविवारी दि. 17 जुलैला रात्री एका विकृत मनस्थितीच्या व्यक्तीने कार्यालयाच्या दरवाजासमोर तसेच इतर वर्गखोल्यांच्या दरवाजासमोर आक्षेपार्ह असा मेसेज लिहिला. शाळेच्या भिंतीवर, काढलेल्या नकाशावर, इतर माहितीवर सुद्धा शेण आणि मातीचा लेप लावून विद्रुप केलेले आहे. सोबतच कुलूपांना सुद्धा मातीचा पेंड लावून त्याला जाम करण्याचा प्रयत्न केला.
चांगले विचार, आचार तसेच कृती घडवीणाऱ्या शाळेलाच विकृत करण्याचा हार्दिक प्रयत्न असून या घटनेमुळे गावातील समाजमन सुन्न झालेले आहे. शाळेत अनेक साहित्य तसेच महत्वाचे रेकॉर्ड असतात. शाळकरी विद्यार्थ्यांसाठी पोषण आहारसुद्धा असतो. त्यामुळे याबाबत तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्याध्यापक गणेश भोयर यांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. तसेच एक ठराव घेऊन त्याची प्रत गटशिक्षणाधिकारी मारेगाव यांना सुद्धा देण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, तसेच गावातील काही नागरिक सोबत होते. आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी गावक-यांनी केली आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.