…. तर खासदारकीचा राजीनामा देईल: खा. नाना पटोले

सत्तेत राहून खा. नाना पटोलेंची आक्रमक भूमिका, सोडणार पक्ष ?

0 287
वणी बहुगुणी डेस्क: सततची नापिकी, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत सापडले आहे. त्यामुळे राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. आपण या परीस्थितीतुन गेलो असल्याने शेतकऱ्यांच्या परीस्थितीची आपणास जाणीव आहे. यावर्षी पाऊस कमी पडल्याने पुन्हा शेतकरी अडचणीत सापडला असून, राज्य सरकार सरसकट कर्जमाफीचा ठोस निर्णय न घेतल्यास आपण खासदारकीचा राजीनामा देऊ असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले आहे. चारभट्टी/पुयार येथील हनुमान मंदीर देवस्थान येथे हनुमान चालिसा पठण व महाप्रसाद कार्यक्रमात बोलत होते.
पटोले पुढे म्हणाले की, आपण लोकप्रतिनिधी असल्याने लोकांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणुन देणे आपले काम आहे. सत्तेत जरी असलो तरी शेतकऱ्यांसाठी विरोधात बोलण्यास आपण सदैव तत्पर आहोत. काही लोकांना अस वाटत आहे की आपण भाजप सोडणार, पण आपण तसला काही निर्णय अजुन पर्यत घेतला नाही.
काँग्रेस-राकॉचे  काही नेते राजीनाम्याच्या गोष्टी करत आहेत. साठ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कितीदा राजीनामे दिले. हवेतुन उडणाऱे आता जमिनीवरच्या गोष्टी करत आहेत. शेतकरी दुष्काळाच्या छायेत असताना राजकारण करत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यां बाबत आपण दोन दिवसात पंतप्रधानासोबत बोलणार आहे. जर पंतप्रधानांनी दुर्लक्ष केले तर राज्य सरकार विरोधात आंदोलन उभारू, आपण जिथ जाऊ तिथ रांगा तयार करू असेही ते म्हणाले.

You might also like More from author

Comments

Loading...