डुकाटीची 60 लाखांची धडाकेबाज बाईक भारतात लॉन्च

जाणून घ्या काय आहे या बाईकची विशेषता

0 178

नवी दिल्ली: डुकाटीने आपल्या धडाकेबाज बाईक 1299 पैनिगल आरची शेवटची एडीशन आता भारतातही लॉंच केली आहे. ही बाईक युएस च्या कॅलिफॉर्नियामध्ये वर्ल्ड सुपरबाईक चॅम्पिअन्सशिपमध्ये प्रदर्शित केली गेली होती. अखेर ही बाईक भारतात देखील लॉन्च करण्यात आली आहे. याची किंमत 59.18 लाख रुपये ठेवली गेली आहे.

काय आहेत या सुपर बाईकचे फिचर्स ?
1299 पैनिगेल आर फायनल एडिशनमध्ये केवळ लास्ट टाईमच एल-ट्विन इंजिन दिले गेले आहे. त्यानंतर कंपनी वी4 इंजिनवर आली आहे. सुपरबाईक वर्ल्ड चॅम्पिअन्सशिपमध्ये इतिहास रचणाऱी ही बाईक आहे. ट्विन सिलिंडर इंजिन बेस्ट असल्याचे डुकाटीतर्फे सांगण्यात येत आहे.

1285 सीसीचे इंजिन 209 बीएचपीची पॉवर आणि 142 एनएम का टॉर्क देण्यासाठी ही सक्षम आहे. पावर 6-स्पीड गिअरबॉक्सच्या माध्यमातून रिअर वीलपर्यंत जाईल. यामध्ये क्वीकशिफ्टर फीचरेदेखील असणार आहे.

पावरफुल इंजिन आणि इलेक्ट्रोनिक्स सोबतच याच्या दोन्ही बाजूस Ohlins सस्पेंशन, बेंब्रो बेक्स, पाइरेली डायब्लो सुपरकोरसा एसपी टायर्स दिले गेले आहेत. यासोबतच कलर टीएफटी डिस्प्ले दिला गेला आहे.

ही नवी बाईक ग्रीन, व्हाईट आणि रेड कॉंम्बिनेशनसोबत तुमच्यासमोर आली आहे. डुकाटी 1299 पैनिगल लिमटेड बाईक नसून नंबर्ड बाइक आहे. किंमतीचा विचार केला तर भारतातील रोडवर ही बाईक जास्त संख्येने दिसणार नाही.

You might also like More from author

Comments

Loading...