व्हॉट्सऍप गृपच्या पोस्टमुळे तणाव, एकाला मारहाण

वंदे मातरमच्या पोस्टवरून झाला वाद, पोस्टकर्त्याला मारहाण

0 321

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील एका व्हॉटसअ‍ॅप गृपवर वंदेमातरमवरून चांगलाच वाद झाला. यात एका समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने काही संतप्त युवकांनी मॅजेस टाकणाऱ्यास बेदम मारहाण करून गावातून वरात काढल्याची खळबळजनक घटना गुरुवार(३ जुलै) ला घडली. या प्रकारामुळे त्यामुळे संपूर्ण नरखेडात तणावाचे वातावरण असून कुठलीही अनुचित घटना होऊ नये म्हणून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़. मारहाणीमुळे हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता असून मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करीत नागरिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला.

नरखेड येथील स्थानिक व्हॉटसअ‍ॅप गृपवर एका खासगी डॉक्टर महाशयाने एक संदेश टाकला होता. या मॅसेजमुळे आमच्या भावना दुखाविल्या गेल्याचा आरोप काही युवकांनी केला. वाद होत असल्याचे पाहून दोन्ही समाजातील वरिष्ठांनी यात हस्तक्षेप केला व कसेतरी प्रकरण शांत केले. परंतु अचानक दुपारी काही युवकांनी या डॉक्टरच्या रुग्णालयावर हल्ला चढविला़ साहित्याची तोडफोड केली. त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली.

याच गृपवर दुसऱ्या एका व्यक्तीनेसुद्धा संदेश टाकला होता. या युवकांनी त्यांच्याही घरी जाऊन त्यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला़, परंतु पोलीस वेळीच पोहोचल्याने पुढील अर्नथ टळला. मारहाणीनंतर नरखेड शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे़ नागरिकांनी पोलीस स्टेशनला घेराव करून मारहाण करणाऱ्या युवकांवर गुन्हे दाखल करावे व त्यांना अटक करण्याची मागणी केली.

यानंतर दुसऱ्या समुदायाचे नागरिकही मोठ्या प्रमणात पोलीस स्टेशनमध्ये आले होते़ यामुळे तणाव आणखीनच वाढला. सदर डॉक्टरच्या तक्रारीवरून नरखेड पोलिसांनी मारहाण करणाऱ्या युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. सध्या तीन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी शुक्रवार(४ जुलैे) नरखेड बंदची हाक देण्यात आली होती. नेमक्या किती जणांवर कारवाई केली, याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व नरखेड ठाणेदार मसराम यांच्याशी संपर्क साधला असता भ्रमणध्वनीवरून प्रतिसाद दिला नाही.

अनेक व्हॉटसअ‍ॅप गृप बंद
या घटनेमुळे नरखेड शहरात तणावसदृश्य स्थिती असली तरी सामान्य नागरीकसुद्धा या घटनेमुळे दहशतीत आहे़. अनेकांनी मित्र मंडळांचा तयार केलेला ग्रृप डिलिट केला आहे़ काही सामाजिक गृपसुध्दा नरखेड येथील युवकांनी तयार केले होते. या गृपच्या माध्यमातून अनेक सामाजिक चळवळीसुद्धा सुरू होती. परंतु त्याही गृपमधून युवकांनी स्वत:ला लेफ्ट करून घेतले आहे़ पोलिसांनी या गृपमध्ये कार्यरत सर्व सदस्यांना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू केल्याची माहिती आहे़.

750 X 422 PODDAR

You might also like More from author

Comments

Loading...