अपघात: नांदेपेरा रोडवर दुचाकीची समोरासमोर धडक

दोघे गंभीर जखमी, उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर

जितेंद्र कोठारी, वणी: येथील नांदेपेरा मार्गावर लॉयन्स इंग्लिश मिडीयम शाळेजवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याची घटना दुपारी 3 वाजता घडली. या अपघातास दोघे गंभीर जखमी झाले. तर दोन तरुणांना किरकोळ इजा झाली. जखमी असलेले दोघेही वरोरा येथील रहिवाशी असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आल्याची माहिती आहे. 

Podar School 2025

प्राप्त माहितीनुसार, वरोरा येथील वामन गणपत रोडे (80) व चंद्रशेखर गौरकार (45) हे दोघेही आज शुक्रवारी दिनांक 6 मे रोजी दुचाकीवरून वणीला कामानिमित्त येत होते. दुपारी 3 वाजताच्या सुमारास वणीतील निखिल पिदूरकर (25) व अंकित धानोरकर (24) हे दोघे आपल्या मोटरसायकलने नांदेपेराकडे जात होते. दरम्यान रेल्वे गेटच्या थोडे पुढे या दोन्ही दुचाकी एकमेकांवर धडकल्या.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यात वरोरा येथील दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तर वणी येथील दोन्ही तरुण किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर जखमींना ऑटोमध्ये ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी वामन गणपत रोडे व चंद्रशेखर गौरकार यांना चंद्रपूर रेफर करण्यात आल्याची माहिती आहे. 

हे देखील वाचा:

वणीत प्रोफेशनल मेकअप व हेअर स्टायलिंग वर्कशॉप

 

Comments are closed.