अपघातास कारणीभूत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा

मनसे कार्यकर्त्यांचे शिरपूर पोलीस स्टेशनला निवेदन

जितेंद्र कोठारी, वणी: दि. 4 मे रोजी वणी चारगाव घुग्गुस महामार्गावर पुनवट जवळ भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत दोन मजुरांचा दुर्देवी मृत्यू झाला. घडलेल्या अपघातास आयव्हीआरसीएल रोडव्हेज कंपनी व बांधकाम विभागातील अधिकारी दोषी असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. याबाबत मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शिरपूर पोलीस स्टेशनला निवेदन दिले.

चारगाव ते घुग्गुस दरम्यान पुनवटजवळ सिमेंट रस्त्यावर पडलेल्या भेगा दुरुस्तीचे काम करणाऱ्या 5 मजुरांना भरधाव ट्रकने चिरडले होते. या दुर्घनेटनेत 2 मजुर जागीच ठार झाले होते तर 3 गंभीर जखमी आहे. महामार्गावर दुरुस्तीचे काम करताना संबंधित आयव्हीआरसीएल कंपनीने कामगारांना कोणतीही सुरक्षा पुरविली नाही. ज्या ठिकाणी काम सुरु आहे तिथे बॅरिकेट्स उभे करण्यात आले नाही. तसेच मजुरांना परिधान करण्यासाठी रेडियम पोशाख सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले नव्हते.

सदर महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडाच्या हद्दीत आहे. महामार्गावर सुरक्षा यंत्रणा शिवाय काम सुरू असताना बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिली कशी? असा प्रश्न उपस्थित करीत या अपघातास आयव्हीआरसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांसह बांधकाम विभागाचे शाखा अभियंता, उप अभियंता व कार्यकारी अभियंता सुद्धा जवाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे, अशी मागणी मनसे तर्फे करण्यात आली. गुन्हा दाखल न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा ही निवेदनात देण्यात आला आहे.

शिरपूर पोलिसांना निवेदन देताना मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, तालुका उपाध्यक्ष प्रवीण डाहूले, विनोद कुचनकर, राजू बोधाडकर, अनिल वासेकर, कवडू मोहितकर, सुजल पावडे, भुपेश मोहितकर, विठ्ठल मोहितकर, ज्ञानेश्वर गौरकार, मंगेश दुरुडकर, मिथुन धोटे, आकाश काळे, मोरेश्वर ननकटे व इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा:

अपघात: नांदेपेरा रोडवर दुचाकीची समोरासमोर धडक

सुपरहिरो डॉ. स्ट्रेंज आलाये भेटीला… नवीन सिनेमा रिलीज…

वणीत प्रोफेशनल मेकअप व हेअर स्टायलिंग वर्कशॉप

.

Comments are closed.