गॅस टँकरला अपघात, टँकर पलटले

0

नागेश रायपुरे, मारेगाव: करंजीकडून चंद्रपूरच्या दिशेने जात असलेले एचपी कंपनीचे गॅसने भरलेले टँकर शनिवारी सकाळी सात वाजताच्या दरम्यान येथील विनायक कोटेक्स मारेगाव जवळ पलटले. मात्र सुदैवाने यात कोणतीही जिवीत हाणी झाली नाही.

सकाळी एमएच 04 एचएस 1844 या क्रमांकाचे हिंदुस्थान पेट्रोलियमचे गॅस भरलेले टँकर गॅस भरून चंद्रपूरकडे जात होते. दरम्यान मारेगावातील विनायक कोटेक्स जवळ सकाळी समोरून येणाऱ्या गाडीने टँकरला कट मारल्याने चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटले आणि टँकर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टँकर रस्त्यावर उलटले.

टँकर ज्या ठिकाणी उलटले त्या ठिकाणापासून ईलेक्ट्रिक पोल खूप जवळ होता. परंतु सुदैवाने गाडी त्या पोलवर आदळली नाही. त्यामुळे मोठी हानी टळली. टँकर पलटल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. या बाबतची माहिती एचपीच्या अधिकार्यांना देण्यात आली. या अपघातात वाहन चालक सुभेदार रंगीलाल सरोज याला कोणतीही दुखापत झालेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.