अट्टल घरफोड्या ‘मोबाईल’ अडकला वणी पोलिसांच्या जाळ्यात 

9 महिन्यांपासून पोलीस घेत होते शोध

0
वणी: नागपूर,चंद्रपूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गेल्या 9 महिन्यांपासून पसार असलेला अट्टल घरफोड्या वणी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्यावर नागपूर शहरात 7 व चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 घरफोड्या केल्याचा आरोप आहे. त्याचं नाव प्रमोद उर्फ मोबाईल अरुण गेडाम (23) असून तो वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रासा इथं असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार मुकुंद कुळकर्णी, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, शेख नफिस, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, उल्हास कुरकुटे, दिलीप जाधव आदींनी रासा येथे जाऊन मोबाईलला ताब्यात घेतले.

(मारेगाव शहर झाले हागणदारीमुक्त ?) 

ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली असता त्यानं भद्रावती व नागपूर शहरातील 15 ठिकाणी चोरी करून चोरलेला माल बुटीबोरी येथे विकल्याची कबुली दिली. गेल्या 9 महिन्यांपासून नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार असलेला अट्टल घरफोड्या मोबाईलच्या मुसक्या अखेर वणी पोलिसांनी आवळल्या.
Leave A Reply

Your email address will not be published.