वेकोलिकडून अहेरी जिल्हा परिषद शाळा मोबदल्यापासून वंचित

ग्रामवासियांना मिळाला मोबदला, मात्र जि.प. शाळेचा प्रश्न अनुत्तरीतच

0
वणी: वणी तालुक्यातील वेकोलिच्या कार्यक्षेत्रात येणा-या अहेरी येथील ग्रामस्थांना त्यांच्या शेती, घरे, स्थावर मालमत्तेचा गोषवारा घेवून वेकोलिने मोबदला दिलाय, त्यांचं पुनर्वसन केलं आहे. मात्र येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत, जागा असतांना त्यांना मोबदला दिला की नाही याबाबत शासंकताच आहे. गावाचं पुनर्वसन करण्यात आल्यानंतर शाळेचंही पुनर्वसन करणं अनिवार्य असतांना शाळेला मोबदल्यापासून वंचित ठेवल्याचा प्रकार येथे दिसत आहे.
वणी तालुक्यातील वर्धा नदीच्या तिरावरील बहूतांश गावातील शेतक-यांच्या जमिनी वेकोलिच्या कोळसा खाणीत गेल्या आहेत. या जमिनीचा ग्रामस्थांना मोबदला सुध्दा मिळाला आहे. जुन्या गावांचं पुनर्वसन करण्यासाठी ग्रामस्थांना जागा व घर बांधण्यासाठीचं अनुदान देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. अहेरी गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे. या गावात राहणा-या ग्रामस्थांच्या मालमत्तेची मोजणी करून त्यांना वेकोलिने मोबदला देवून पुनर्वसन केले आहे. मात्र याच गावात गेल्या कित्येक वर्षापासून जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेला पटागंण सुध्दा आहे. मग वेकोलिने या शासकीय शाळेचे मोजमाप केले की नाही याबाबत साशकंताच आहे.
जर ग्रामस्थांच्या घरांचे मोजमाप करून त्यांना मोबदला देण्यात येतो तर शाळेचे मोजमाप करून पुनर्वसन केलेल्या जागेवर नवीन शाळा बांधून रंगरंगोटीसाठी लागणारा खर्च आणि शाळेची इमारत तयार करून देणे क्रमप्राप्त होते. पण तसं झालं नसल्याचं दिसून येत आहे. येथील मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी याबाबत वेकोलिला पत्रव्यवहार केला की नाही. सदर जागा मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचे नावे असतांना त्यांच्या नावाने वेकोलिने मोबदला दिला काय असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

 

(हे पण वाचा: अबब…!  अहेरी येथील जिल्हा परिषदेची शाळा चक्क बंद

अहेरीचे पुनर्वसन करण्याची प्रक्रीया सुरू असतांना शाळा प्रशासन तसेच शिक्षण विभागाने याबाबत पाठपुरावा केला कि नाही हे एक कोडेच आहे. सोबतच तेथील शिक्षक मात्र गेल्या महिनाभरापासून कुठेही हजेरी न लावता शासनाचा पगार घरबसल्या घेताना दिसत आहे. शाळा बंद झाल्यापासून संबधीत शिक्षकांना कुठेही प्रतिनियुक्ती देण्यात आली नाही हे विशेष. यावरून शाळेच्या मुख्याध्यापकांनी पंचायत समितीला माहिती दिली नाही की पंचायत समितीने दूर्लक्ष केले असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. एकूणच पुनर्वसन झालेल्या अहेरी येथील शाळेला वेकोलिने वंचित ठेवल्याने अहेरी येथील जिल्हा परिषदेची शाळा मात्र उजाड गावातच अखेरच्या घटका मोजायला लागली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.