शेंदूरजना येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

कुपोषीत बालक, गरोदर व स्तनदा मातांची तपासणी

0
मानोरा (प्रतिनिधी): तालुक्यातील मौजे शेंदूरजना अढाव येथील प्राथमिक आरोग्यं उपकेंद्रात मानव विकास मिशन अंतर्गत नुकतेच कुपोषीत बालक व माता तपासणी शिबीर पार पडले. या शिबीरात 53 गरोदर माता,05 स्तनदा माता व 30 बालकांची तपासणी करून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांनी उपचार केले.

या प्रसंगी आरोग्यधाम हॉस्पीटल ॲन्डं क्रिटीकल केअर सेंटर दिग्रसचे संचालक तथा प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.श्याम जाधव यांचेसह शेंदुरजना आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.बी.एन.खंडारे,बालरोग तज्ञ डॉ.राहूल पाटील आदींनी कुपोषीत बालक व गर्भवती रूग्ण मातांची तपासणी केली. यावेळी गर्भवती मातांना मोफत औषधीचे वाटप करण्यात आले.

मार्गदर्शन करतांना डॉ.श्याम जाधव म्हणाले की, उन्हाळा लागला असव्याने या काळात गर्भवती मातांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांनी वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहीजे. तसेच कुपोषीत बालकांना सकस आहाराचे खादय द्यावे. यावेळी त्यांनी महीलांचे आरोग्याबाबत सविस्तर माहीती दिली.

मानव विकास अंतर्गत आयोजीत शिबीर यशस्वी करण्याकरीता आरोग्य विभागाचे श्री.रवींद्र दाभाडकर, आरोग्य सहायक के.डोंगरे, एस.एम.भोयर, एस.पी.गोटे, कु.नेमाने यांचेसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.