रोजचा दिवसच पर्यावरणदिन म्हणून साजरा करावा- संजय खाडे

श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेद्वारा एपीएमसीत पर्यावरणदिन साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: निसर्ग आपल्याला भरभरूनच देत असतो. त्यासाठी आपण निसर्गाचे आभार मानले पाहिजे. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. पर्यावरणदिन केवळ एका दिवसापुरता मर्यादित ठेवू नये. रोजचा दिवसच पर्यावरणदिन म्हणून साजरा करावा. पर्यावरणाची सर्वांगांनी काळजी घ्यावी. अशा भावना जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्थेचे अध्यक्ष संजय खाडे यांनी ‘वणी बहुगुणी’जवळ व्यक्त केल्यात. गुरुवार दिनांक 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा झाला. त्यानिमित्त एक छोटेखानी कार्यक्रम झाला.

पर्यावरणदिनाचे औचित्य साधून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेद्वारा वृक्षारोपण करण्यात आले. एक माझी वसुंधरा अभियान अंतर्गत “एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम झाला. यावेळी जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्थेचे अध्यक्ष संजय खाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती वणीचे अ. का. झाडे, श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष ईश्वर खाडे, व्यवस्थापक चेतन मांडवकर, पत्रकार परशुराम पोटे, राजू धवंजेवार यांच्यासह पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.