शिरपूर: शिरपूर येथील मेनका नथ्थुजी मुन यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसापासून त्या आजारी होत्या. आजारपणामुळे त्यांनी काही दिवसांपासून अन्न सेवन कमी केले होते. अखेर बुधवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मेनका मुन या वणी बहुगुणीचे संपादक निकेश जिलठे यांच्या आजी आहेत.
मनेकाबाई यांच्यावर उद्या गुरूवारी 23 मे रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अंत्ययात्रा प्रकाश मुन यांच्या घरून सकाळी 9 वाजता निघणार आहे. त्यांच्यामागे तीन मुलं, तीन मुली, सुना, नातवंड, पनते असा मोठा आप्त परिवार आहे.