संडासच्या गटरमध्ये गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू

वेकोलि प्रशासनाने केले हात वर

0 2,315

विलास ताजने, वणी: संडासचे गटर साफ करतांना गुदमरून दोन कामगारांचा मृत्यु झाल्याची घटना दि.२१ मंगळवारी दुपारी वणी तालुक्यातील कैलासनगर वसाहतीत घडली. मारोती वाघमारे वय ४२ आणि हनुमान कोडापे वय ४० रा.येनक असे मृतकांची नावे आहेत.

वेकोलीच्या कैलासनगर वसाहतीतील संडासचे गटर साफ करण्याचे काम खाजगी ठेकेदारा मार्फत केले जात होते. गटर साफ करतांना विषारी वायूमुळे दोघांचाही मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. दुपारी चार वाजताच्या सुमारास लहान मुले चेंडू खेळत असताना सदर बाब लक्षात आली.

मृतकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. सदर प्रकरणी वेकोली प्रशासनाने हात वर केले आहे. शिरपूर पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. मृतक मारोती वाघमारे यांच्या मागे पत्नी तर हनुमान कोडापे यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. सदर घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Loading...