वणीत आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

युवासेनेतर्फे ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप

0

बहुगुणी डेस्क, वणी: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा 13 जून रोजी गुरुवारी वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी वणीतील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाअभावी शेतक-यांचे पीक हातून गेले. त्यामुळे शेतक-यांची परिस्थिती लक्षात घेऊन  विश्वास नांदेकर यांच्या आदेशानुसार अत्यंत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी युवासेनेचे विक्रांत चचडा, सतिश व-हाटे, शहरप्रमुख राजू तुराणकर, राजू देवडे, हिमांशू बतरा, राजू वाघमारे, सौरभ खुंगर, लाला पुन्याणी, सिराज चचडा, हरीओम गुगनाळी, अजय मन्ने, प्रशांत दुबे,, ललित जुनेजा, नरेंद्र ताजणे, महेश चौधरी, संजय लोणारे, अजय सातपुते, शरद ठाकरे, बंटी येरणे, सुभाम बोरे, यांच्यासह युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.