भर पावसात दोन ट्रॅव्हल्स आगीत जळून भस्मसात

वणीत शुक्रवारी पहाटे घडला थरार

0
विवेक तोटेवार, वणी: शनिवारी पहाटे तीन च्या दरम्यान चामाटे ले आऊट येथे उभ्या असलेल्या दोन ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. यात दोन्ही ट्रॅव्हल्स जळून भस्मसात झाल्या आहेत. भर पावसात ही घटना घडल्याने तिथे एकच गर्दी जमली होती.
वरोरा रोड वणी येथील चामाटे ले आऊटमध्ये प्रकाश डाहुले राहतात. त्यांचे बालाजी ट्रॅव्हल्स नावाने व्यवसाय आहे. शुक्रवारी भाडे असल्याने ही ट्रॅव्हल्स मुकुटबन ते गिरड अशी फेरी मारून आली होती. त्यानंतर रात्री साडे नऊच्या दरम्यान त्यांच्या राहुल मधूकर टोंगे या चालकाने अपघातग्रस्त दोन्ही ट्रॅव्हल्स (MH 34 A-8488, MH 34 A-8494) मालक असलेले डाहुले यांच्या घरासमोर लावल्या. त्यानंतर चालक घरी गेला.
पहाटे तीन वाजताच्या दरम्यान या दोन्ही ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतला. पहाटे चाडे चार पाच वाजताच्या दरम्यान जेव्हा काही लोक उठले तेव्हा त्यांना भर पावसात या ट्रॅव्हल्स पेटत असताना दिसल्या. लोकांनी याची लगेच माहिती मालक डाहुले यांना दिली.
यामध्ये मालक डाहुले यांचे 25 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ट्रॅव्हल्स जळली तेव्हा पाऊस सुरू होता. त्यामुळे सध्यातरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असा कयास व्यक्त केला जात आहे. सोबतच हा अपघात आहे की घातपात याविषयीही अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. या घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.