मांडवी येथे अण्णाभाऊ साठे यांची ९० वी जयंती साजरी

पहिल्यांदाच झाले अण्णाभाऊ साठे यांच्या फलकाचे अनावरण

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांडवी या गावी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ९० वी जयंती साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे प्रथमच ही जयंती मांडवी गावात करण्यात आली. येथील मादगी समाजबांधवानी पुढाकार घेऊन शिक्षक गायकवाड व सिडाम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यकम घेतला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या फलकाचे अनावरण अॅड. मोरे यांच्या हस्ते केले.

या कार्यकमाचे अध्यक्षस्थानी जलपत कर्दलवार होते. उद्घाटक मोरे, प्रमुख पाहुणे राजू गोंडरावार, चंद्रशेखर सिडाम, युवराज गायकवाड, माजी उपसरपंच राजू सिडाम, सचिन कुडसंगे, पोलीस पाटील, नारायण मिरकुलवार, गंगाराम शिरगुरवार, गजानन चांदेकर, रघू पाटील हे होते. यावेळी मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच राजू गोंडरावर, राजेंद्र, पाटील, यांची भाषणे झालीत. शेखर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे संचालन अमोल चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान कुरेवार, शिवारेड्डी दर्शावार, नरसिंग जुतुवार, शंकर शिरगुरवार, प्रशांत शेंदरे, निखील दर्शवार, प्रशांत मंदावार, अमृत कुरेवार, नीलेश कर्दलवार, राकेश मेडपटलावार, रमेश दर्शनवार, रमेश अननेलवार, अशोक नूतपेलिवार, अशोक कर्दलवार, संदीप सुरपाम, अक्षय सिडाम, विनोद कनाके, भीमराव नगराळे, दिगंबर कोरिवार, गंगारेडडी आणि इतर समाज बांधव उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.