महाराष्ट्र ब्लड टीमचा मध्यप्रदेशात सत्कार

0

सुशील ओझा, मुकूटबन:- रक्तदान हे माणुसकीच्या दुनीयेतील सर्वात श्रेष्ठ दान म्हटले जाते. गेली कित्येक दिवस सोशल मीडियातून रक्तदाते जुळवीत मोबाईलचा वापर करून गरीब गरजू रूग्णांना मोफत रक्तदाते देण्याचे कार्य महाराष्ट्र ब्लड टीम आणि अनेक संघटना करीत आहेत. असेच रक्तदानाचे उल्लेखनीय कार्य करणारे महाराष्ट्र ब्लड टिमचे सदस्य प्रफुल भोयर यवतमाळ, अभिषेक ठाकुर अमरावती, गणेश मुद्दमवार मुकूटबन, आशीष भावसार नागपूर, चैतन्य तेलरांधे वर्धा, धीरज भोयर वणी, सागर इळकर चिमूर, गोकुल जुमनाके नागपूर, प्रियल पथाडे मुकूटबन यांचा मध्यप्रदेशात सत्कार करण्यात आला.

तहसिलदार आर. के. गुवा, आकांक्षा समाचार चीफ ब्युरो सुनील शर्मा, जनपद सदस्य गोपाल दास बैरागी, राष्ट्रीय मानवधिकार तथा सामाजीक न्याय संगठन प्रदेश सचिव रक्तमित्र मांगीलाल सोलंकी तसेच रक्तयोद्धा संरक्षण समीती यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तेथील सर्व प्रमुख मंडळी यांनी खऱ्या देशहिताचे कार्य तुम्ही करता असे महाराष्ट्र ब्लड टीम व इतर रक्तमित्रमंडळी यांना अभिनंदनपर भाषणात म्हणून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. हा सत्कार समारंभ रक्तयोद्धा संरक्षण समिती महीदपूर यांच्यातर्फे नागदा जिल्हा उज्जैन, मध्यप्रदेश येथे आयोजित केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.