नगरपालिका हद्दीचा संदर्भ देत बीडीओंचा विकास कामांना आळा
हस्तांतरीत नसलेल्या लेआउटमध्ये रस्त्याचे काम केल्याचा लावला जावईशोध
वणी: वणी शहरालगत असलेल्या चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीतील काही भाग वणी नगरपालिकेत समाविष्ट होणार आहे. या संबंधीचं पत्र संबंधीत विभागाला प्राप्त झाले आहे. मात्र जो भाग नगरपालिका हद्दीत नाही असा भाग पालिकेत समाविष्ट असल्याचं पत्र गटविकास अधिका-यांनी देऊन जावईशोध लावला आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी विकास कामांमध्ये खोडा घालत आहे असा आरोप होतोय.
चिखलगाव ग्रामपंचायतीनं नवीन वस्तींमध्ये विकासात्मक कामं केली आहे. ज्या भागात ज्या सोयीसुविधा हव्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक भागात रस्ते नाही त्या भागात तात्पुरत्या स्वरुपात का होईना रस्ते तयार करून दिले आहे. मात्र स्थानिक पंचायत समितीच्या राजकारणाचा चिखलगाव ग्रामपंचायत बळी ठरताना दिसत आहे. याआधी सुद्धा विकास कामात खोडा घालीत पदाधिका-यांनी तक्रारी केल्या होत्या. आता त्यांच्याच मायाजाळात अडकून गटविकास अधिकारी काम करताना दिसत आहे.
चिखलगाव येथे महादेव नगरी ही नवीन वसाहत तयार झाली आहे. ती साईकृपा डेव्हलपर्सची मालमत्ता आहे. परिणामी या भागातील रस्ते नाली व इतर कामं ही त्या डेव्हलपर्सनीच केली आहे. मात्र असं असताना वणी पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांनी स्थानिक पदाधिका-यांच्या मायाजाळात अडकले आहे. त्यांनी महादेव नगर येथील सिमेट काँक्रीट रस्त्याची पाहणी केली, या पाहणीमध्ये त्यांना नगरपालिकेच्या हद्दीत काम सुरू असल्याचे आढळले. त्यामुळे सदर काम त्यांनी त्वरित बंद करण्याचे पत्र चिखलगाव ग्राम पंचायतीचे सचिव व सरपंचांना दिले. इतकेच नव्हे तर सदर रस्त्याचे काम सुरू असल्याचा उल्लेख ही पत्रात करण्यात आला आहे.