सुशील ओझा, झरी: सध्या संजय देरकर यांचे वणी विधानसभा क्षेत्रात 200 युनिट मोफत वीज व विजेचे दर कमी करण्यासाठी स्वाक्षरी अभियानांतर्गत दौरा सुरू आहे. सोमवारी संजय देरकर यांनी कार्यकर्त्यांसह मुकुटबन सर्कलचा दौरा केला. यात सुमारे 3 हजार लोकांनी स्वाक्षरी केली.
सोमवारी मुकुटबन, गणेशपुर, खडकी, येळद, खातेरा, बेलापूर, मांगली, भेंडाळा, रुईकोट, अडेगाव इत्यादी गावांमध्ये स्वाक्षरी अभियानांतर्गत भेट देण्यात आली. यावेळी गावात गृहभेटी घेऊन कार्यकर्त्यांनी गावक-यांना स्वाक्षरी अभियानाबाबत माहिती दिली.
9 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या स्वाक्षरी अभियानाला लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय. लोकांना आपल्या परिसरात तयार होणा-या विजेवर आपला हक्क आहे हे पटू लागले आहे. त्यामुळे लोक या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. आतापर्यंत सुमारे 18 हजार लोकांनी स्वाक्षरी करून या अभियानाला प्रतिसाद दिला आहे. – संजय देरकर
यावेळी डॉ. नेताजी पारशिवें, नेताजी पारखी, हरदास भोंगळे, संतोष पारखी सरपंच गणेशपुर खडकी, संतोष कुचनकर, भगावन मोहिते, राजू लडके, विलास कालेकर, शंकर देरकर, ईकरे गुरुजी, राजू आसूटकर, सोपान बरडे, अशोक पाईलावर, संजय धाडे, पवन आत्राम, प्रकाश माईकलवार, बाबाराव खडसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.