मांडवी येथील तरुणाचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू

अथक प्रयत्नानंतर सापडला मृतदेह

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांडवी येथील तरुणाचा नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. माहितीनुसार मांडवी येथील लक्ष्मण श्यामराव आडे (३०) बोरी येथील चिकन विक्री सेंटरवर मजुरीने काम करत होता. सकाळी कामावर जाणे व सायंकाळी परत येणे असे होते . १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाऊसही जोरात सुरू होता. घरी परत येत असताना बोरी व मांडवी रोडवर असलेल्या रफट्या वर पोहोचला. रफट्यावरून पायी जात आसताना अचानक पाण्याची पातळी वाढली. त्यात तो वाहून गेला.

ही माहिती गावकऱ्यांना मिळताच पंचायत समिती सदस्य राजेश्वर गोंडरावार हे घटनास्थळी पोहचले. सदर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. गावातीलच काही भोई लोकांना पाण्यात त्याला शोधण्याकरिता लावले. परंतु रात्री आठ वाजेपर्यत तो काही मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी यवतमाळ येथील एनडी एफए आर च्या टीमला बोलाविण्यात आले. रात्रीच बचावकार्याची टीम पोहचली. सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली.

अखेर चार वाजता त्याचे प्रेत टाकळी गावाजवळील डोहाजवळ मिळाले. ते शवविच्छेदनाकरिता झरी पाठवले. रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांनी भेट दिली. तसेच मृतकाच्या घरची परिस्थिती गरिबी आहे. त्याला वडील नसल्याने तो आईची देखरेख स्वतःच करीत होता. त्याच्या मृत्यूमुळे वृद्ध आईची देखरेख कोण करेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.