वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

आजाराचं नैराश्य की, दुसरे कारण?

0

पंकज डुकरे, कुंभा: येथील एका वृद्ध इसमाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजता दरम्यान उघडकीस आली. गणपत लक्ष्मण गाऊत्रे (70) असे मृतकाचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून सततच्या पाऊस पडत असल्यामुळे त्यांच्या घरची भिंत त्याचा अंगावर कोसळली होती.

Podar School 2025

त्यात त्याचा पायाला गंभीर इजा पोहचली होती. तेव्हा पासून मृतक अंथरूणाला खिळला होता. तो प्रतिकूल परिस्थितीत जीवन व्यथीत करीत होता. मृतकाची पत्नी शेतात मजुरीला गेल्याची संधी साधून त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. नैराश्य की आणखी कोणते दुसरे कारण या आत्महत्येमागे होते ते कळू शकले नाही.त्याच्या मागे पत्नी, दोन मुली असा आप्त परिवार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.