अप्पर पोलीस अधीक्षक नुरूळ हसन यांची वणीला सदिच्छा भेट
सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्रकारांशी साधला संवाद
विवेक तोटेवार, वणी: मंगळावर दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता जिल्हात नव्याने रुजू झालेले अप्पर पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. सर्वसामान्यांना प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण या पदावर रुजू झाल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
तळागाळातील सर्वसामान्य जनतेला पडणारे प्रश्न सोडविण्याचे ब्रीदवाक्य घेऊन पुढे येणाऱ्या गणेश उत्सव, मोहरम, नवरात्र उत्सव व विधानसभा निवडणुकीच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यात पोलीस प्रशासनाला आपल्या सहकार्याची साथ असावी असे बोलून पत्रकारांना पोलीस प्रशासनाबाबत पडणारे प्रश्न विचारण्यास विनंती केली. पत्रकारांच्या वतीने पोलीस वसाहत अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असल्याची माहिती देण्यात आली. वाहतूक शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचा प्रश्न, शहराच्या मध्यभागी असणाऱ्या अत्यंत संवेदनशील चौकाचौकात असणाऱ्या बिट व चौक्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
अशा अनेक प्रश्नांचा भडीमार पत्रकारांकडून करण्यात आला. संपूर्ण प्रश्न एकूण घेऊन त्यावर वरिष्ठांना माहिती देण्याचे आश्वासन दिले. तसेच वाहतूक शाखेकरिता 18 होमगार्ड व पोलीस ठाण्याकरिता 20 होमगार्ड लवकरच स्थाई नियुक्त करण्यात येत असल्याची महत्वपूर्ण माहिती दिली.
आजची ही भेट फक्त सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्याकरिता होती. वणी उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यांचे काम अत्यंत प्रशंसनीय असलायचे त्यांनी यावेळी बोलून दाखविले. कार्यक्रमाच्या शेवटी वणी पत्रकारांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव , पोलीस कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.