विवेक तोटेवार, वणी: मोठया थाटात गणपतीचे घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी आगमन झाले. रीतीरिवाजनुसार काही जणांनी दीड दिवस गणपतीची सेवा केली. काहींनी पाच दिवस गणपतीची पूजा-अर्चना केली. शनिवारी पाच दिवसाच्या गणपतीला भाविकांनी मोठया श्रद्धेने निरोप निरोप दिला.
सोमवारी 2 सप्टेंबर ला आपल्या लाडक्या बाप्पाची मोठ्या श्रद्धेने प्राणप्रतिष्ठा केली. बाप्पाला शनिवारी पाच दिवस पूर्ण झाले. परंपरेनुसार ज्यांच्या घरी पाच दिवसांचा गणपती होता, त्यांनी शनिवारी बाप्पाला निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ या गजरात आपल्या आवडत्या बाप्पाला निरोप देण्यात आला. पाच दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा केल्यानंतर भाविक अधिकच भावनिक झाले असल्याचे दिसून येत होते. वणीच्या जीवनदायिनी निर्गुडा नदीच्या पात्रात या लाडक्या गणेशाला निरोप देण्यात आला.गणपती आणि निर्गुडेचाही सन्मान
गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्याकरिता व निर्माल्य विसर्जित करण्याकरिता नगर पालिकेकडून व्यवस्था करण्यात आली होती. एका टाक्यामध्ये विसर्जित करण्याची व्यवस्था करण्यात आली. ज्यामुळे नदी प्रदूषित होणार नाही व मूर्तीची विडंबना होणार नाही याची संपूर्ण काळजी घेण्यात आली. कारण अनेकदा मूर्ती विसर्जित केल्यानंतर पाण्यात नकळत ती पायाखाली येऊन मूर्तीची विडंबना होते. हा प्रकार थांबविण्याकरिता व प्रदूषणाला आळा घालण्याकरिता नगर पारिषदेकडून मूर्ती व निर्माल्य विसर्जित करण्याची व्यवस्था करण्यात आली. एक प्रकारे हा गणपती आणि निर्गुडेचाही सन्मान झाला.