शेतकऱ्यांच्या हिताकरिता सर्व पक्षांनी एकत्र यावे -बुरेवार
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आमसभेत शेतकरीहितांचे निर्णय
सुशील ओझा, झरी: शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारी कृषी उत्पन्न बाजारसमिती असते. कृषि उत्पन्न बाजार समिती झरीच्या १४व्या आमसभेचे सभापती संदीप बुरेवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या हॉलमध्ये घेण्यात आली. प्रास्ताविकामध्ये सभापती बुरेवार यांनी मागीलवर्षी शेतकऱ्यांनाचा शेतीमाल सुरक्षित राहावे चोरीस जाऊ नये याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. तसेच शेतकऱ्यांनाच्या पिकावर बोंडअळीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे अतोनात नुकसान झाले. त्याच्यावर उपाययोजना म्हणून बोंडअळीचा मोठा कार्यक्रम घेण्यात आला.
शासनाकडून तूर व चण्याचे पैसे उशिरा मिळत आहे. त्याकरिता रास्तारोको व आमरण उपोषण केले. शेतकऱ्यांच्या न्यायाकरिता मी सदैव तयार असल्याचे ते बोलले. शासन शेतकऱ्यांचा कापूस निघाल्यावर सीसीआयची खरेदी करण्याचा विचार करते. खरेदी सुरू होण्यापूर्वी खाजगी बाजारात शेतकरी कापूस विकून मोकळा होतो. तरी शेतकऱ्यांचा कापूस निघण्यापूर्वीच सीसीआय खरेदी सुरु करावे अशी मागणी त्यांनी भाषणातून केली.
पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा कोणताही प्रश्न उपस्थित झाला की सर्व पक्षचे नेते व कार्यकर्ते येतात परंतु विदर्भातील नेते किंवा कार्यकर्ते येत नाही किंवा पाठिंबा सुद्धा देत नाही हे एक दुर्दैव असल्याचे सुद्धा बोलले .शेतकर्यांच्या प्रश्नावर सर्व पक्षांनी एकत्र येऊन मोर्चे काढून न्याय मिळवून द्यायला पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन सचिव रमेश येल्टीवार यांनी मानले तर आभार प्रदर्शन राजीव आस्वले यांनी मानले. त्यावेळेस उपसभापती संदीप विचू संचालक सुनील ढाले,बापूराव जींनावार,भास्कर भोयर,विजय पांनघंटीवार,कुशकुमार,केमेकार,शंकर पाचभाई, बळीराम पेंदोर,सौ ज्योती वराटे, भगिरथा चिंतावार,गजानन मांडवकर, संजय भोयर,बाबूलाल किनाके,विमलचंद जैन,अरविंद येनगंटीवार,प्रभाकर मंदावार व कर्मचारी विठ्ठल उईके,दयाकर एनगंटीवार,श्यामसुंदर रायके सह मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.