१०३ गणेश विसर्जनांचा भार ५८ पोलीस व २५ होमगार्डसच्या खांद्यावर

ग्रामपंचायत व शांतता कमिटीचा राहणार सहभाग

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यात मुकुटबन पोलीस स्टेशनअंतर्गत ५८ सार्वजनिक गणेश मंडळाचे तर पाटण पोलीस स्टेशनअंतर्गत ४५ गणेश मंडळाचे असे एकूण १०३ मंडळचे विसर्जन दोन दिवस होणार आहे. विसर्जन करिता दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये कर्मचारी कमी असून मुकूटबन ठाण्यात एकूण ३० कर्मचारी अधिकारी धर्मराज सोनुने व उपनिरीक्षक वनदेव कपडे व १५ होमगार्ड आहेत.

पाटण ठाण्यातसुद्धा दोन अधिकारी अमोल बारापात्रे व उपनिरीक्षक गणेश मोरे मिळून २८ कर्मचारी आहे. १० होमगार्ड असे दोन्ही पोलीस स्टेशन मिळून ८३ जणांवर १०३ गणेश विसर्जनाची जवाबदारी येऊन ठेपली आहे.

गणेश विसर्जन शांततेत पार पडण्याकरीता पोलीस स्टेशन मध्ये शांतता कमेटी, पोलीस पाटील व गणेश मंडळांच्या पदाधिकारी यांच्या मिटिंग झाली. मंडळांच्या व पोलीस पाटलाच्या जवाबदारी बाबत सांगण्यात आले. विसर्जनादरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, तसेच आनंदात मिळून मिसळून शांततेत विसर्जन व्हावे याकरिता शांतता कमेटीसुद्धा राहणार आहे.

ग्रामपंचयत विसर्जन ठिकाणी लायटिंगची व्यवस्था करणार आहे. मुकूटबन येथील गणेश विसर्जन तलाव व वणी पाटण मार्गावरील नाल्यामध्ये विसर्जन होणार आहे. पाटण येथील मोठ्या गणपतीचे विसर्जन दिग्रस येथील पैनगंगा नदीत तर लहान गणपती गावाजवलीलच नाल्यात होणार आहे.

विसर्जन दरम्यान दारू पिऊन अडथळा किंवा झगडे करून बाधा उपस्थित करणाऱ्याकडे पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. विशेष म्हणजे एवढ्या कमी पोलीस कर्मचारी असूनसुद्धा विसर्जन दरम्यान आजपर्यंत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा अजूनही कोणतेही अनुचित प्रकार दोन्ही पोलिसस्टेशनच्या हद्दीत घडला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.