वणीत तहसील कर्मचाऱ्यांचे दिवसभर कामबंद आंदोलन

किशोर तिवारी यांच्या विरोधात तहसील कर्मचाऱ्यांचा एल्गार

0

विवेक तोटेवार, वणी: शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी घाटंजी येथील महिला तहसीलदार व दोन महिला कर्मचारी यांना अपमानजनक शब्दात बोलून त्यांचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. बुधवारी अगदी क्षुल्लक कारणावरून त्यांचा अपमान झाल्याचं म्हणणं आहे. या घटनेच्या निषेधार्थ वणीतील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, अवल कारकून, तलाठी, लिपिक, वाहनचालक, शिपाई, कोतवाल यांनी या आंदोलनाला साथ देत शुक्रवारी दिनांक 20 सप्टेंबर रोजी कामबंद आंदोलन केले.

शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी नाहकच घाटंजी येथील तहसीलमधील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण जिल्हात उमटलेत. 20 सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात तहसील कर्मचाऱ्यांद्वारा कामबंद आंदोलन करीत या घटनेचा निषेध केला. शुक्रवारी सकाळी 11 वाजतापासून तहसील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले.

सायंकाळी 5 वाजेपर्यंत वणी तहसील कार्यालयात संपूर्ण कर्मचाऱ्यांची काम बंद ठेवले. या घटनेच्या विरोधात प्रशासनाकडून ठोस पावले उचलून दोषींवर कारवाई करावी. अशी मागणी या तहसील कर्मचाऱ्यांची आहे. शनिवारी काय पावले या कर्मचाऱ्यांकडून व प्रशासनाकडून उचलल्या जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.