फवारणीतून विषबाधा, शेतकऱ्याचा मृत्यू

कुंभा परिसरातील साखरा येथील घटना

0

पंकज डुकरे, कुंभा: परिसरातील साखरा येथील शेतकऱ्याचा फवारणीतून विषबाधा होऊन मृत्यु झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री एकच्या दरम्यान घडली. पुरूषोत्तम गोविंद किनाके रा.साखरा (३९) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे संयुक्त १० एकर शेती आहे.

सध्या शेत पिकावर किडीचे आक्रमण झालेले आहे.पिके वाचविण्यासाठी शेतकरी पिकावर मोठ्या प्रमाणात फवारणी करीत आहेत. मृतक शेतकऱ्याच्या पिकावरही किडीचा प्रादूर्भाव झाल्याने मृतक मागील तीन दिवसांपासून सतत फवारणी करत होता.अशातच शेतकरी २ ऑक्टोबर रोजी फवारणी करून घरी येत असताना भोवळ येऊन पडला.

घरच्या मंडळींच्या लक्षात येताच तात्काळ उपचारार्थ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने वणी येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी प्रकृती खालावत गेल्याने नातेवाईकांनी तात्काळ नागपूर येथील सरकारी दवाखान्यात भरती केले. मात्र काल रात्री दि.३ तारखेला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, सहा वर्षीय मुलगी, चार वर्षीय मुलगा व बहीण असा आप्त परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.