वणी विधानसभा रणकंदन: नामांकन दाखल

अंतिम लढतीचे चित्र ७ ऑक्टोबर नंतर होणार स्पष्ट

0
वि. मा. ताजने, वणी: विधानसभे करिता इच्छुकांनी  नामांकन दाखल केले,. यात काँग्रेसचे वामनराव कासावार, भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार, मनसेचे राजू उंबरकर, भाकपचे अनिल घाटे, संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे, बसपाचे संतोष भादिकर, वंचित बहुजन आघाडी कडून डॉ. महेंद्र लोढा, अपक्ष विश्वास नांदेकर, अपक्ष संजय देरकर, अपक्ष सुनील कातकडे, अपक्ष मृत्युंजय मोरे आदींचा समावेश आहे. अर्ज छाननी नंतर ७ ऑक्टोबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतरच खऱ्या लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
दरम्यान काँग्रेसच्या उमेदवारी करिता वामनराव कासावार, संजय देरकर यांच्यात प्रचंड चुरस झाली. मात्र कासावार यांना उमेदवारी मिळाली. भाजपच्या उमेदवारीसाठी आमदार बोदकुरवार यांच्या पुढे पक्षातीलच इच्छुकांनी कडवे आवाहन उभे केले होते. मात्र विध्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार उमेदवारी खेचून आणण्यात यशस्वी झाले. मनसेकडून राजू उंबरकर यांना पुन्हा उमेदवारी बहाल केली.
राष्ट्रवादी कडून डॉ. महेंद्र लोढा यांनी उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र आघाडीच्या वाटपात वणीची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्यामुळे डॉ. लोढा यांचा प्रचंड हिरमोड झाला. अखेरीस डॉ. महेंद्र लोढा यांनी वंचित बहुजन आघाडी कडून उभे राहण्याचा निर्णय घेतला. तर शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर, सुनिल कातकडे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली. काहींनी शक्तिप्रदर्शन करीत तर काही उमेदवारांनी गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज दाखल करण्याला पसंती दिली.
Leave A Reply

Your email address will not be published.