अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-याची भेट ठरली चर्चेचा विषय
कुणावरही कारवाई न झाल्याने प्रशासनाला 'चुना' लागल्याची तक्रार
विवेक तोटेवार, वणी: राज्यात गुटखा व सुगंधी तंबाखुवर बंदी असताना त्याची तंबाखू माफियांद्वारे राजरोजपणे अनधिकृतरित्या विक्री सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासान विभागाच्या एका अधिका-याने मंगळवारी वणीच्या दुकानांना भेट दिली. वणीतील एका प्रतिष्ठीत व्यापा-याला सोबत घेऊन या ‘जोडी’ने शहरातील दुकानांना भेट दिली. या दौ-यात अनधिकृत विक्रेत्यावर कार्यवाहीची अपेक्षा असताना अधिकारी कारवाईविनाच परतले. ही बाब ‘पटेल’ किंवा न ‘पटेल’ तरी यामुळे मात्र वणीत विविध चर्चेला उधाण आले आहे.
मंगळवारी गुटखा व सुगंधीत तंबाखू विक्री णा-या व्यापा-यांच्या प्रतिष्ठानाची तपासणी करण्याकरीता पहाटेच अन्न व औषध प्रशासनाच्या एका अधिका-याने पहाटेच वणी गाठले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा जुन्या बस स्थानक परिसरातील एका व्यापा-याकडे वळवला. त्या व्यापा-याकडून बाईक घेऊऩ सकाळी 8.30 च्या दरम्यान त्यांनी सर्वात आधी खाती चौकातील एका व्यापा-याला गाठले. त्यानंतर या अधिका-याने वणीतील चक्क एका प्रतिष्ठीत तंबाखू व्यापाराला सोबत घेतले. या ‘जोडी’ने मग शहरातील काही पान मटेरिअलच्या विक्रेत्यांना भेट दिली. वणीत सुगंधीत तंबाखू व गुटख्याची राजरोसपणे विक्री सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट असली तरी कुणावरही कार्यवाही न झाल्याने अधिका-यानेच प्रशासनाच ‘चुना’ लावून गेल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
एका व्यापा-याने काढला व्हिडीओ
सदर भेट ही वणीतील मुख्य चौकातच असल्याने ही भेट अनेकांच्या नजरेत भरली. एखादी ‘बैलजोडी’ जशी शेतात फिरते तशी ही जोडी विविध पान मटेरिअलच्या दुकानाला भेट देत फिरत होती. त्यातच एका सुज्ञ व्यापा-याच्या ही बाब लक्षात येताच त्याने मोबाईलवर याचे चित्रन केले. त्यातच कोणत्याही अवैध विक्रेत्यावर करवाई न झाल्याने ही भेट चांगलीच चर्चेत आली.
वणीत सध्या सुगंधी तंबाखू व गुटखा विक्रेत्याचा माफियाराज चांगलाच विस्तारला आहे. या अवैध विक्रीवर अंकुश ठेवण्याचे काम अन्न व औषध प्रशासनावर आहे. मात्र हा दौरा कारवाईचा होता की फक्त ‘पान सुपारी’चा होता याची चर्चा सध्या वणीत रंगत आहे. वणी विभागात जवळपास प्रत्येक गावातच गुटखा व सुगंधी तंबाखू टाकलेला खर्रा मिळतो. तरुणच नाही तर सर्वच वयोगटातील लोक या व्यसनात अडकले आहे. गुटख्यामुळे कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे शासनाने गुटख्यावर बंदी आणली आहे. मात्र अऩ्न व औषध प्रशासन यावर मुग गिळून गप्प आहे.