सिंफनीच्या ‘जिना इसी का नाम है’ मैफलीत रसिक तृप्त

सिंफनी म्युझिकल गृपचे यशस्वी आयोजन

0

बहुगुणी डेस्क, अमरावती: गीत, संगीताच्या माध्यमातून पुन्हा नव्याने ऊर्जा देण्याचा प्रयत्न सिंफनी ग्रुप ऑफ म्युझिकल, कल्चरल अॅण्ड वेलफेअर ट्रस्टने केला. त्यासोबतच सर्वच संगीतप्रेमींसाठी ‘जिना इसी का नाम है’ ही निःशुल्क संगीतमैफल स्थानिक टाऊन हॉलमध्ये आयोजित केली. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला सामाजिक कार्यकर्ते डॉ. गोविंद कासट, महिंद्रा जेनरेटर्सच्या जनरल मॅनेजर सुचिता खुळे, खंडेलवाल ज्वेलर्सचे संचालक दीपकजी खंडेलवाल, अभीयंता अरविंद व्यास, जयंत वाणे आणि सिंफनीचे अध्यक्ष सचिन गुडे उपस्थित होते.

अभीयंता योगेश जयस्वाल, जयकुमार कदम, प्रणिता बोडके ,अभीयंता संजय व्यवहारे, प्रा.अरविंद मोकदम, अभीयंता अरविंद व्यास, दीपकजी खंडेलवाल, निक्की राईकवार, गुरुमूर्ती चावली, सिरिषा चावली, जयंत वाणे, पल्लवी राऊत, प्रा. मनीष देशमुख,प्रा.धनंजय देशपांडे, अभीयंता दीपक सुतवणे आणि समृद्धी चिखलकर यांच्या गायनांनी मैफल समृद्ध झाली.

एकॉरडियनची साथ गजानन देउळकर,गिटारची साथ विशाल रामनगरिया, तबल्याची साथ विशाल पांडे, कांगो आणि ढोलकची साथ विनोद थोरात, सॅक्सोफोनची साथ अमित वानखडे, ऑक्टोपॅडची साथ राजेंद्र झाडे यांनी केली. कीबोर्डची साथ आणि संगीतसंयोजन सिंफनीचे अध्यक्ष इंजि. सचिन गुडे यांचे होते. मैफलीचे बहारदार निवेदन नासीर खान यांनी केले. ध्वनिव्यवस्था रॉयल साउंड सर्व्हीसचे रईसभाई यांनी सांभाळली.

‘ना कजरे की धार’ हे गीत अभीयंता योगेश जयस्वाल सर यांनी सादर केलं. कदम सरांच्या ‘चांद आहे भरेगा’ या गीताने मैफलीत रंग चढला. प्रणिता बोडके मॅडम यांनी ‘मुझे तुम मिल गये हमदम’ हे गीत प्रस्तुत केलं. दीपकजी खंडेलवाल यांनी ‘हम तुमसे जुदा होके’ या गाण्यातून जुन्या जमान्याची आठवण करून दिली. अभीयंता व्यवहारे सर यांचं ‘न तुम हमे जानो’ हे गीत शानदार राहीलं. प्रा. मनीष देशमुख यांच्या ‘दर्दे दील दर्दे जिगर’ गीताने धमाल केली. अभीयंता अरविंद व्यास सर यांच्या ‘ए भाई जरा देख के चलो’ हे गीत रसिकांच्या हृदयात बसलं.

गुरुमूर्ती चावली यांनी ‘चांद जेसे मुखडे पे बिंदिया सितारा’ हे गीत आपल्या खास शैलीत पेश केलं. जयंत वाणे यांच्या ‘मंजिले अपनी जगह है’ या गीताने रसिकांना मंत्रमुग्ध केलं. निक्की राईकवार यांच्या ‘होंठोपे ऐसी बात’ या गीतावर रसिकमन थिरकले. अभीयंता दीपक सुतवणे सर यांच्या ‘जिना यहा मरना यहा’ गीताने मुकेश यांच्या आठवणी जाग्या झाल्यात. शिरिषा चावली यांच्या ‘बाबूजी धिरे चलना’ या गीताने मैफलीत रंगत आली. धनंजय देशपांडे यांच्या ‘दिवाना मैं हू’ या गीताला रसिकांनी विशेष पसंती दर्शविली. पल्लवी राऊत यांच्या ‘यारा सिली सिली’ गीताने लतादिदींचा सुवर्णकाळ उभा केला.समृद्धी चिखलकर यांचं ‘बिजली गिराने मे हू आई’ हे गाणं रसिकांच्या विशेष पसंतीस उतरलं’ प्रा.अरविंद मोकदम सर यांनी ‘दिल की आवाज भी सून’ या गाण्यात जान ओतली. संतोष मालवीय सर यांनी ‘हमने तुमको देखा’ या गाण्यातून मैफलीत बहार आणली’ दीपकजी खंडेलवाल आणि निक्की राईकवार यांनी ‘करवटे बदलते रहे सारी रात हम’ हे युगलगीत पेश केलं.

जयंत वाणे सर यांनी ‘आज कल याद कुछ और रहता नही’ हे गीत प्रस्तुत केलं. अभीयंता अरविंद व्यास सर यांचं ‘कौन है जो सपनो मे आया’ हे गीत मैफलीचं आकर्षण राहीलं. गुरुमूर्ती चावली यांच्या ‘सून ओ हसिना काजल वाली रे’ या गीताने मैफलीत धमाल केली. अभीयंता व्यवहारे सरांचं ‘सजनरे झुट मत बोलो’ हे गाणं ऋदयस्पर्शी ठरलं. प्रा. मनीष देशमुख यांचं ‘प्यार हमारा अमर रहेगा’ हे गीत सुरेख झालं. अभीयंता दीपक सुतवणे सर यांचं ‘अजी ऐसा मौका फिर कहा मिलेगा’ गण्याने तर मैफलीत धमाल केली.
सिंफनी ग्रुप ऑफ म्युझिकल, कल्चरल अॅण्ड वेलफेअर ट्रस्टच्या याही प्रयोगाला रसिकांनी भरभरून दाद दिली. रसिकांच्या भरगच्च उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.