सुशील ओझा, झरी: उन्हाळा सुरू होण्याच पाण्याची समस्या प्रत्येक गावात पाण्याची निर्माण होते. झरी येथे गेल्या अनेक वर्षांपासून दोन खाजगी फिल्टर पाणी प्लांट सुरू आहे. दोन्ही प्लांटमध्ये बोअर करून पाण्याचा उपसा सुरू आहे. ज्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालवून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे झरीतील जंगोम दलातर्फे हे दोन्ही प्लांट बंद करावे अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत त्यांना नगरपंचायतीला निवेदन सादर केले.
झरी तालुक्याचे स्थळ असून ग्रामपंचायत वरून नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले आहे. तालुक्याचे स्थळ असल्यामुळे सर्वच शासकीय कार्यालय शाळा कॉलेज असून दररोज हजारो लोकांची रेलचेल असते. तालुक्यासह इतर ठिकाणावरून जनता शासकीय कामाकरिता येतात. त्यामुळे इथे पाण्याची गरजही मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी पाण्याचा उपसा होत असल्याने उन्हाळ्यात पाण्याची समस्या उद्भवू शकते.
निवेदन देते वेळी जंगमचे तालुकाध्यक्ष कालिदास अरके, प्रशांत किनाके, अनिकेत मेश्राम, विजय मरापे, हरिष किनाके यांच्यासह जंगमचे कार्यकर्ते उपस्थित होते.