विवेक तोटेवार, वणी: कोरोना विषाणू बाबत जनतेने घाबरून जाऊ नये तर सावधगिरी बाळगावे असे आव्हाहन उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी वणीकरांणा केले. गुरुवारी 19 मार्च दुपारी 12 वाजता महसूल भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वोत्तपरी प्रयत्न करीत आहे. याकरिता जिल्हाधिकारी यांच्याकडून आलेल्या आदेशाचे पालन केल्या जात आहे. यामागचा उद्देश हाच आहे की, या विषाणूचा संसर्ग अधिक लोकांना होऊ नये. नव्याने आलेले आदेशानुसार ब्युटी पार्लर, केश कर्तनालय, देशी दारूची दुकाने, बार, पानटपरी हे आदेश येत पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
18 मार्च रोजी एक नवीन आदेश दिला आहे ज्यामध्ये मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, बोद्ध विहार, गिरीजघर या तसेच सर्वच धार्मिक स्थळी पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्रित येऊ नये. या विषाणूची लागण ही स्पर्शाने होत असल्याने तसेच संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने होत असल्याने गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. अशा अनेक सूचना या पत्रकात परिषदेत उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी केल्या. पत्रकार परिषदेत उ.अ. शरद जावळे, तहसीलदार धनमणे, मुख्याधिकारी संदीप बोरकर तसेच ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर, आरोग्य विभागाचे अधिकारी व पत्रकार बंधू उपस्थित होते.
कापड दुकान व खाद्य पदार्थ विक्रीबाबत अद्याप सूचना नाही
अद्यापही कापड दुकान व खाद्य पदार्थ विक्रीबाबत कोणत्याही सूचना जिल्हाधिकारी यांच्याकडून आलेल्या नाहीत. परंतु या ठिकाणी अधिक गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या दुकानात एकाच टेबलावर दोन व्यक्ती येणार नाही, दोन टेबलाच्या मध्ये अंतर अधिक असावे अशाप्रकारच्या काही सूचना दिल्या गेल्या आहेत.