जयप्रकाश वनकर, बोटोणी: सध्या सर्वत्र जगभरात चर्चेत असलेल्या कोरोन वायरसचे परिणाम आता ग्रामीण भागावर पडला असून, यवतमाळ जिल्यात जमाव बंदी कायद्या अंतर्गत गाव खेड्यातील पान टप-या चहा दुकाने आठवडी बाजार सुधा १४ एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत. संपूर्ण देशामध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. कोरोन वायरसचा प्रसार हा गाव खेडया पर्यंत पोहोचू नये या साठी जिल्यात जमाव बंदी लागू केली गेली असून गर्दी कमी करण्याच्या उदेशाने येथील पान टपर्या चहा दुकाने पुढील आदेश येई पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत.
सर्वत्र बंद स्थिती असताना मोल मजुरी करून उदार निर्वाह करणाऱ्या वर्गाची चांगलीच पंचायत होत असताना दिसत आहे. रोज हाताला मिळेल ते काम करुण कुटुंबाचा गाडा हाकला जात असताना कोरोना संकटाने ह्यात भर घातली आहे. खेड्यातील लघु उधोगाचे चित्र सुधा ह्या पेक्षा वेगळे नाही, दिवसभर आपला व्यवसाय करून कुटुंब चालवणे सुरु होते. ते पण आता बंद असल्या कारणाने मोठ्या आर्थिक संकटाना सामोर जावे लागत आहे. ह्यामध्ये बऱ्याच महिलांनी हप्तेवारी, किंवा मासिक हप्ता असलेले कर्ज घेतले आहे.
हप्त्याला ७०० ते २००० रु पर्यंतचे कर्ज भरावे लागत असते .गटातर्फे देण्यात येणाऱ्या कर्जाचे हप्ते भरणे सुधा कठीण झाल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. ह्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मजूरदार वर्ग असो वा लघु व्यवसाईक सध्या सक्षम नाही आहे. अशा स्थितीत कर्ज मुदत वाढवून देण्यात यावी किंवा यामध्ये काही सुट देण्यात यावी अशी मागणी गावातील मजूरदार महिला व लघु व्यवसाईक यांचेकडून केली जात आहे.