वकोलि कर्मचा-यांच्या जिवाशी खेळ

वेकोलिचे कार्य सुरू, संसर्ग होण्याची शक्यता

0

जब्बार चीनी, वणी: कोरोना आजाराच्या संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे देशभरात लॉकडाऊन तर राज्यात जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात संपर्कामुळे हा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका लक्षात घेता केंद्र व राज्य शासन विविध उपाययोजना केल्या आहेत.

शासकीय कार्यालयासोबतच अनेक औद्योगिक कारखानेही बंद आले आहे. रेल्वे सारखे प्रचंड उलाढाल असलेले क्षेत्र ही केंद सरकारने बंद केले असून लोकांचा सार्वजनिक संपर्क आटोक्यात येण्याकरता पूर्ण प्रयत्न केले जात असताना वेकोलि प्रशासनाने मात्र अट्टाहासाने आपले उत्पादन चालूच ठेवले असून कर्मचा-यांच्या आरोग्याकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

कर्मचा-यांना मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड वॉश केंद्र ह्यासारख्या कुठल्याही सुविधा न देता कर्मचा यांना काम करण्यास बाध्य केले जात असून वेकोलि खाणीमधील कर्मचा-यांची संख्या लक्षात घेता तिथे संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. तरीही वेकोलि प्रशासनाने आपला उत्पादन उद्दिष्ठ गाठण्याचा अट्टाहास कायम ठेवला असून हा वेकोलि कर्मचा यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. वेकोलि प्रशासनाने ह्या संदर्भात त्वरीत उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.