आरसीसीपीएल कंपनीतर्फे कामगारांना विविध सेवा
दोन ते तीन हजार कामगारांची करण्यात आली व्यवस्था
सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील आरसीसीपीएल कंपनीमध्ये विविध राज्यातील सुमारे दोन ते तीन हजार कामगार कामासाठी आलेले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली होती. त्यामुळे कंपनीने त्यांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. यात त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था आहे.
मुकुटबन येथील आरसीसीपीएल या सिमेन्ट कंपनीत मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिसा, तेलंगणा, पंजाब इत्यादी राज्यातून सुमारे दोन ते तीन हजार कामगार आहेत. त्यांच्या राहण्याचा आणि जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. याबातची माहिती प्रशासनाला देण्यात आली होती.
यावरून तहसीलदार जोशी, नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर,पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार धर्मा सोनुने गटविकास अधिकारी सुधाकर जाधव तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम यांनी वेळोवेळी कंपनीला भेटी देऊन कामगारांबाबत तपासणी राहण्याची व्यवस्था व जेवणाच्या व्यवस्थे बाबत सूचना केल्या. तसेच कोरोना पासून बचाव करिता उपाय योजना सांगितल्या.
प्रसासनाच्या आदेशावरून कंपनीने सर्व मजुरांची देखरेख, राहण्याची व जेवणाची संपूर्ण व्यवस्था केली असून ७ मार्च पर्यंतच्या जेवणाची व्यवस्था करून धान्य भरून ठेवण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच शासनाकडून लॉकडाऊनचे दिवस वाढल्यास पुढची जवाबदारी स्वीकारण्याची तयारी कंपनीने दाखविली आहे.
कंपनीत ३०० एकर जागेवर प्लांटचे काम सुरू आहे परंतू लॉक डाऊनमुळे सध्या बंद आहे. तसेच कंपनीमध्ये विविध कामाकरिता वेगवेगळे ठेकेदार असून त्यांच्या हाताखाली हे कामगार काम करतात. यातील अनेक कामगारांचे पगारसुद्धा झाले नसल्याची ओरड होती परंतु कंपनीने स्वतः पुढाकार घेऊन बहुतांश मजुरांचे पगारसुद्धा केल्याची माहिती मिळाली आहे. तर काही मजुरांचे पगार थोड्याच दिवसात पूर्ण करणार असल्याचे आहे.