वणीत रविवारी भरणार साहित्यिकांची मांदियाळी

जिल्हा साहित्य संमेलनाची तयारी जोमात

0

वणी: विदर्भ साहित्य संघ शाखा वणीच्या वतीने दि.13 ऑगस्टला वसंत जिनिंगच्या सभागृहात जिल्हा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भातील नामवंत साहित्यिक सहभागी होणार आहेत. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य उत्तम रुद्रवार असून संमेलनाचे उदघाटन जेष्ठ पत्रकार शैलेश पांडे करणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.रमाकांत कोलते, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे राहणार आहे.

संमेलनाच्या उदघाटनापूर्वी सकाळी 9:30 वाजता यवतमाळ जिल्ह्यातील साहित्यिकांच्या ग्रंथाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. उदघाटन सोहळ्यात उमरखेड येथील कवी दिलीप कस्तुरे यांच्या ‘कस्तुरीगंध’ या काव्य संग्रहाचे प्रकाशन होणार आहे. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात होणाऱ्या कथाकथन सत्राच्या अध्यक्ष स्थानी प्रकाश कामतकर(यवतमाळ) राहणार असून या कथाकथनात अ.भा.ठाकूर,प्रा.नितीन कोल्हे(यवतमाळ), प्रशांत पांडे (उमरखेड) व उर्मिला निनावे सहभागी होणार आहे.

तिसऱ्या सत्रात कवी संमेलन रंगणार आहे. या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुरेश गांजरे राहणार असून या कवी संमेलनाचे सुत्रसंचलन सुनील इंदू वामन ठाकरे हे करणार आहेत. या कविसंमेलनात दीपक आसेगावकर(पुसद), आबिद शेख (सवना), रवींद्र चव्हाण, डॉ. अनिल काळबांडे (उमरखेड), निलंकृष्ण देशपांडे(पोहनडुल), कलीम खान(आर्णी), कांचन वीर(नेर), अ.कृ.बावणे(घाटंजी), शुभदा मुंजे, प्रा.दिनकर वानखेडे, प्रा.सिद्धार्थ भगत(यवतमाळ), प्राचार्य रमेश जलतारे(पांढरकवडा),गौरव खोंड, सुभाष उसेवार, राजेश महाकुलकर , प्राची पाथ्रडकर, स्वप्ना पावडे, भावना गंगमवार, शंकर घुंगरे, मधुकर सवरंगपते, अविनाश महालक्षमे, प्रा.डॉ.अन्नपूर्णा चौधरी इत्यादी कवी सहभागी होणार आहेत.

शिक्षकांना आवाहन
साहित्याची आवड असणाऱ्या शिक्षकांनी 100 रुपये प्रतिनिधी शुल्क भरून या संमेलनात सहभागी व्हावे असं आवाहन साहित्य संमेलनाच्या संयोजकांनी केले आहे. सहयोग शुल्कासंबंधी गजानन कासावार यांच्याशी संपर्क साधावा.
मोबाइल नंबर
98 23 220550, 07972381927

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.