स्वर्णलीला शाळेत छात्रसंघाचा पदग्रहण सोहळा

नियुक्तीपत्र व पदचिन्ह देवून सन्मान

0

वणी: वणीतील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलमध्ये 9 ऑगस्ट क्रांतीदिनी नवनिर्वाचित छात्र संघाचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सी. शिवारामाक्रीष्णा हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश आवारी यांनी केले. प्रसंगी नवनिर्वाचित छात्र संघास प्राचार्यांनी नियुक्तीपत्र व पदचिन्ह देवून सन्मानित करण्यात आलं. तसंच येणा-या काळात त्यांच्यावर येणारी जबाबदारी यासंबधीची माहीती देण्यात आली.

अश्विनी मत्ते, प्रथमेश कुर्हाड यांची छात्र प्रमुख, निधी भंडारी, सुरज पटेल यांची क्रीडा प्रमुख, सुनयना मदान, क्रिश पाराशर विज्ञान प्रमुख… सारा छाजेड, मो. आदील यांची भाषा विभाग समिती प्रमुख, पलक फेरवानी, प्रियांशू तिवारी सांस्कृतिक प्रमुख… धनश्री घोडके, सर्वेश गोहोकार यांची एम्रल्ड हाउसप्रमुख, लुंबिनी वाहाणे, अनन्या चिंडालिया रूबी हाउसप्रमुख, स्नेहा कोठारी, प्रथम पारखी, सफायर हाउस प्रमुख, तसेच मिताली कोटेचा यांची टोपाझ हाउस प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

(हे पण वाचा: शिरपूर-शिंदोला रस्त्यावर जीवघेणा खड्डा)

प्राचार्यांनी नवनिर्वाचित छात्र संघास शुभेच्छा देवून शाळेच्या जबाबदारी बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रेरणा चोरडीया, प्रिन्सी चिंडालीया, अंशूल अग्रवाल व निक्की कुमार यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.