जब्बार चीनी, वणी: पोस्टाच्या विविध योजनांवरील व्याजदरात १.४ टक्के घट करण्यात आली आहे. रिकरिंगच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहक शंभर रुपयांपासून २० हजार रुपयांपर्यंत पोस्टात बचत करतो. पोस्टात व्याजदर कमी मिळत असले तरी रिस्क नको म्हणून पोस्ट आजही ठेवीदारांची आवडती संस्था आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रकारच्या कर्जाच्या वसुलीला जूनपर्यंत स्थगिती दिली आहे.
पोस्टाचे बचत खाते वगळता पुढील तीन महिन्यांत नव्याने येणाया सर्वप्रकारच्या ठेवीवर 1 ते दीड टक्क्यांनी व्याजात कपात केली आहे. ही कपात 1 एप्रिल ते 30 जून २०२० या तीन महिन्यांसाठी आहे. याकालावधीत नवीन खाती उघडणा-या ग्राहकांना हा नवीन व्याजदर लागू होणार आहे. जुन्या खातेदारांवर याचा परिणाम होणार नाही.
पोस्टाच्या विविध योजनांवरील व्याजदरात १.४ टक्के घट करण्यात आली आहे. सिनअर सिटीजनसाठी आठी 8.6 टक्के व्याज दर होता तो आता 7.4 झाला आहे. पीपीएफवर आता ७.९ ऐवजी ७.१ टक्के व्याज मिळेल. सुकन्या समृद्धी योजनेवर ७.६ टक्के (आधीचा व्याजदर ८.४ टक्के) आणि मुदत ठेवींवर ५.५ ते ६.७ टक्के व्याज मिळणार आहे. पाच वर्षे मुदतठेवींवर ७.७ टक्क्यांऐवजी ६.७ टक्के व्याजदर मिळेल, तर तीन वर्षांसाठीच्या ठेवींवर ६.९ ऐवजी ५.५ टक्के व्याजदर मिळणार आहे. किसान विकास पत्रावर ७.६ ऐवजी ६.९ टक्के व्याज मिळणार आहे.