राजूर ईजारा येथील रास्त भाव दुकानावर प्रशासनाची धाड

जादा दराने धान्य विकत असल्याची तक्रार

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राजूर येथील वार्ड क्रमांक 1 मधील अधिकृत रास्त भाव दुकानात अन्न व पुरवठा विभागाने धाड टाकून कारवाई केली. या दुकानात गहू व तांदूळ हा शासनाने ठरविलेल्या दरापेक्षा अधिक दराने धान्य विकणे व शासनाने ठरवून दिल्यापेक्षा कमी धान्य वितरीत करीत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावरून आज प्रशासनाने या दुकानावर कारवाई केली.

वार्ड क्र.१ ( राजूर ईजरा ) मधील रास्त भाव दुकानदार मारोती सदाशिव मानकर हा अंत्योदय योजना व अन्न सुरक्षा कायदा योजनेअंतर्गत धान्य वितरीत करतो. या दुकानातून गहू व तांदूळ ३५ किलो ऐवजी २० किलो वितरीत केला जात होता. तसेच अन्न सुरक्षा योजनेत तांदूळ २ रुपया ऐवजी ३ रुपये आणि गहू ३ रुपये ऐवजी ४ रुपये दराने विकला जात होता.

यासह दिलेल्या अनाजाची पावती ही लाभार्थ्यांना दिली जात नव्हती. याबाबत गावकऱ्यांनी तहसीलदार यांचे कडे तक्रार केली असता वणी येथून मंडळ अधिकारी झाडे व तलाठी कंडारकर यांनी मोक्यावर धाड टाकून तपासणी केली. या मध्ये त्यांना तथ्य आढळून आल्याने त्यांनी गावकऱ्यांच्या साक्षीने पंचनामा करून पुढील कार्यवाही साठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविले आहे.

हा प्रकार फक्त एकच रास्त भाव दुकानात होत नसून गावातील सर्वच दुकानात होत आहे. सर्वच जण जास्त पैसे घेतात व पावती सुद्धा देत नाहीत. आता उरलेल्या रास्त भाव दुकांनदारावर कारवाई करावी अशी मागणी राजूरवासी करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.