जब्बार चीनी, वणी: उच्च प्रतिच्या कोळशा ऐवजी माती दगडाचे मिश्रण रेल्वे सायडींग वर खाली करताना सुरक्षा गार्डनी पकडलेल्या टिप्परवर 20 दिवसांनंतर ही वेकोलिकडून कोणतीही कार्रवाई झालेली नाही. त्यामुळे प्रकरणाची तक्रार विजींलेसकडे करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे तीन महीन्यापूर्वीच रेल्वे सायडींगच्या नावाने खदानीतुन येणारा कोळसा हा चोरी करून खुल्या बाजारात विकण्यात येत असल्याची तक्रार मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी सीएमडी ला केली होती.
22 मार्च 2020 रोजी वेकोलि वणी नार्थ क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या दोन सुरक्षा गार्डना रात्री अडीच वाजता माहिती मीळाली की युनाईटेड कोल कॅरीअर कंपनीत चालत असलेला टिप्पर (एम.एच. 34 एव्ही 3096) रेल्वे सायडींग वर खाली न होता परस्पर बाहेर गेला आहे. दोनही गार्ड ताबडतोब सायडींगवर पोहोचले तर त्यांना सदर टिप्पर दिसला नाही. अर्ध्या तासानंतर तो टिप्पर सायडींगच्या काट्यावर आला असता गार्डनी तो टिप्पर वेगळा खाली करायला लावला. टिप्पर खाली झाल्यावर तीथे 28 टन कोळसा ऐवजी माती दगड याचे मिश्रण दिसून आले.
दुस-या दीवशी सकाळी सायडींग इंजार्ज निशादने रात्री घडलेली घटना कोलारपिंपरीचे उपक्षेत्रीय प्रबंधक प्रसाद यांना सांगितली. त्यांनी ताबडतोब नोडल अधिकारी राहुल बन्सोड यांना रेल्वे सायडींग वर पाठवीले. बन्सोड यांनी त्या कोळसाचा पंचनामा करून आपला अहवाल दिला. ज्यात स्पष्ट लिहीले की सदर कोळसा हा कोलारपिंपरी खाणीचा नाही. सदर टिप्पर चा मालक शेख समीर शेख रफीक असुन त्याच्यावर वणी पोलिस स्टेशन मध्ये कोळसा चोरी व वेकोलिच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला करण्याचे गुन्हे दाखील आहे.
जीपी आर एस विभागानं सु्द्धा आपला अहवाल दीला की रात्री 2.44 ते 3.51 वाजेपर्यत त्या टिप्पर चा जीपीआरएस बंद होता. टोल नाक्यावरून जी माहीती आली त्यातही गाडीचे टायमींग जुडत नव्हते. एवढं सर्व स्पष्ट असताना रेल्वे सायडींग इंचार्जने ताबडतोब पोलीस स्टेशनला एफआयआर करून सदर गाडी ब्लॅक लिस्ट करण्याचा प्रस्ताव वरीष्ठांकडे सादर करावयास पाहिजे होता. पण तसे काही न करता ताब्यात असलेली गाडी सुद्धा सोडुन दिल्याची मेहरबानी करण्यात आली. कोलारपिंपरी सबएरीया मॅनेजरनी युनीव्हर्सल कंपनी कडुन 28 टन कोळशाची दुप्पट रक्कम बीलातुन कपात करण्याची कार्रवाई सुद्धा अजुन केलेली नाही.
रेल्वे सायडींगवर कोळसा एवजी सेल, काळे गोटे, चुरी खाली होत आहे हे उघड्या डोळ्याने दिसल्या नंतरही त्याची चौकशी न होण्याचे कारण काय ? या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विजीलेंस कडे करण्यात आली आहे.