प्रतिनिधी, शिंदोला: दिनांक 13 ऑगस्ट रविवारी शिमदोला येथें मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सहा वाजता या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. शिव बहूउद्देशीय संस्था व संजय निखाडे मित्र परिवारातर्फे ही विदर्भ स्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली गेली आहे. मॅरेथान स्पर्धे दरम्यान रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन देखील करण्यात आलं आहे.
मॅरेथॉन स्पर्धा तीन गटात होणार आहे. पुरुष, महिला व अठरा वर्षांखालील मुलांचा गट असणार आहे.पुरुष गटाला सहा व महिला गटाला तीन की.मी. अंतर पार करायचं आहे. स्पर्धेत नि:शुक्ल प्रवेश आहे. स्पर्धकांना ओळखपत्रं आवश्यक आहे. अठरा वर्षा खालील मुलांच्या गटात केवळ वणी विधानसभा क्षेत्रातील मुले प्रवेश घेऊ शकतात.
प्रत्येक स्पर्धकास एक टी शर्ट मिळेल. स्पर्धा सकाळी सहा वाजता सुरू होईल. विजेत्यांना दोन हजार ते सात हजारापर्यंत बक्षीस मिळणार आहे. तसेच प्रोत्साहनपर बक्षीस देखील दिले जाणार आहे. स्पर्धा आटोपताच रक्तदान ,आरोग्य शिबिर होणार आहे. गरजुंनी शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.