ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलीस ठाण्यात नगरसेवकांची बैठक

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर बैठक

0
वणी: आगामी गणपती उत्सव, पोळा, गोकुळाष्टमी, दुर्गोत्सव, आदी उत्सवात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर आळा घालण्यासाठी वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी नगर पालिकेतील नगराध्यक्ष व नगरसेवकांची दक्षता भवनात बैठक आयोजित केली होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

 या बैठकीत शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच ध्वनी प्रदूषण मुक्त करण्यासाठी बैठकीत चर्चा झाली. यावेळी नगरसेवकांनी एकमताने ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे मान्य केले. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संग्राम ताठे उपस्थित होते
Leave A Reply

Your email address will not be published.