शिबला येथील रेशन दुकानदाराबाबत दुसरी तक्रार
कार्ड धारकला चार वर्षांपासून धान्य वाटप नाही !
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शिबला येथील रेशन दुकानदाराने चार वर्षांपासून कुपन असूनसुद्धा अन्नधान्य दिले नसल्याची तक्रार तहसीलदार यांना केली असून रेशन दुकांदारावर कार्यवाहीची मागणी केली आहे.
शिबला आदिवासी समाजातील गरीब रोजमजुरी करून जीवन जगणारा विनोद मानकु टेकाम याचे कुपन क्रमांक 272007722071 प्राधान्य योजनेचा असून याला गेल्या चार वर्षपासून अन्नाचा एक दनासुद्धा मिळाला नाही उलट रेशन दुकानदाराने चलाखी करून स्वतःचा अंगठा (थम्ब) लावून मार्च व एप्रिल 2020 चे रेशन उचल केली आहे असा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.
लॉकडाऊन मुळे आधीच रोजमजुरी नाही. त्यामुळे जगणे कठीण झाले आहे. त्यातही कुपणवरील धान्यावर कसेबसे दोन वेळेसचे जेवण मिळेल अशी आशा असतांना रेशन दुकांदारानेच कुपनावरील धान्य उचलल्याचे लक्षात येत असेल तर आम्ही जगायचे कसे असा प्रश्न उपस्थित केला आहे.
अन्नधान्य मिळत नसल्याने गरीब विनोद टेकाम याने तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे. यापूर्वी शिबला गावातीलच श्याम मडावी याला सुद्धा 4 महिन्यांपासून कुपनवरील अन्नधान्य मिळत नसून दोन महिन्याचे धान्य उचल केल्याची तक्रार केली होती. या तक्रारीच्या चौकशी करीत पुरवठा निरीक्षक मसराम यांच्याकडे टेकाम यांनी 4 वर्षांपासून रेशन दुकानदार अन्नधान्य देत नसल्याची माहिती देऊन कुपनसुद्धा दाखविले होते.
मसराम यांनी त्याची नोंद घेतली होती परंतु नोंद घेऊन काहीच उपयोग न झाल्याने अखेर 30 एप्रिल रोजी तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली. एका आठवड्यात सदर रेशन दुकानदाराची दुसरी तक्रार असून दोघांच्या कुपणवरील मार्च व एप्रिल महिन्याच्या धान्याची उचल दुकानदारांनी केल्याची तक्रार आहे.
पहिला तक्रारकर्ता मडावी हा दोन वेळा तहसील कार्यालयात जाऊनसुद्धा त्याच बयाण घेण्यात आले नाही. उलट त्याला सोमवारी बोलावण्यात आले. गरीब मजूर व्यक्ती लोकडाऊन मध्ये तीन वेळा 20 किमी तहसील कार्यालयात कसा जाईल असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
तक्रार करून आमचं चुकलं का? अशी खंत तक्रारकर्ते व्यक्त करीत आहे. याावरून सदर दुकान दाराला वाचविण्यााचा तर प्रयन्त तर होत नाही ना संशय व्यक्त केला जात आहे. तरी रेशन दुकानदारांची चौकशी नायब तहसीलदार मार्फत करून दोषी आढळल्यास रेशन दुकांदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून दुकानाचा परवाना रद्द करावा अशी तक्रार टेकाम यांनी केली आहे.