अल्पवयीन मुलगी बेपत्ता, तक्रार दाखल

आजीकडे जात असल्याचे सांगून अद्याप पोहचली नाही घरी

0

विवेक तोटेवार, वणी: वणीत आपल्या आजोबांकडे राहणारी एक अल्पवयीन मुलगी आपल्या आजी व आईकडे जाते अशी सांगून घरून निघून गेली. परंतु अद्यापही ती तिच्या मूळ गावी पोहचली नसल्याने तिच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

संगीता (बदललेले नाव) ही मुळची केळापूर तालुक्यातील एक लहानशा गावातील आहे . ती वणीत आपल्या आजोबांकडे राहत होती. घरची परिस्थिती बिकट असल्याने आई मोलमजुरी करून घर चालविते. संगीता ही 25 जानेवारीला आपल्या आजी व आईकडे जाते म्हणून सांगून घरातून निघाली. परंतु ती अजूनही घरी पोहचली नाही.

तिचे आईशी फोनवर बोलणे होत आहे. ती कुठे आहे याबाबत ती काहीही माहिती देत नसून लॉकडाऊन संपल्यानंतर घरी येणार असल्याचे ती बोलत आहे. तब्बल तीन महिने उलटून गेल्यानंतरही संगीता घरी न आल्याने तिच्या आईने 1 मे ला वणी पोलिसात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तिच्या आईच्या तक्रारीवरून वणी पोलिसात कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. संगीताचा वणी पोलीस शोध घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.