ट्रक दुचाकी अपघातात वेकोली कर्मचारी ठार, एक गंभीर

लाल पुलिया परिसरातील घटना

0

जितेंद्र कोठारी, वणी: येथील लालपुलिया परिसरात आज गुरुवारी सकाळी ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका वेकोली कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेला त्याचा मुलगा गंभीर जखमी झाला.

वेकोली भांदेवाडा येथे कामावर असलेले संतोषकुमार गरीबदास (50) रा. माजरी जि. चंद्रपूर हे आपल्या मुलासह माजरी येथून दुचाकी क्र. MH-34 BJ 3153 ने भांदेवाडा ड्युटीवर जात होते. वणी यवतमाळ मार्गावर लालपुलिया परिसरात सोना माता मंदिराजवळ एका वळणावर दुचाकीची ट्रक क्र. MH-34BG3164 जोरदार धडक झाली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या दुर्घटनेत संतोषकुमार गरीबदास व त्याचा मुलगा प्रमोद संतोषकुमार गरीबदास दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांना उपचाराकरिता वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र संतोषकुमार गरीबदास यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. फिर्यादी प्रमोद संतोषकुमार गरीबदासच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी ट्रकचालकास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.