बार मधील स्टॉकची तफावत दूर करण्यासाठी बारचालकांची धावपळ

अबकारी विभागाच्या जिल्हाधिकारीकडे पाठविल्या जाणा-या अहवालाकडे सर्वांचे लक्ष

0

सुशील ओझा, झरी: देशात लॉकडाऊन दरम्यान सरकारने बियरबार, देशी दारूचे दुकान व वाईनशॉप यांच्यावर बंदी आणून संपूर्ण दारू विक्री बंद केली होती. शासनाचे आदेश दारू बंदचे येताच तालुक्यातील १२ बियरबार व ७ देशी दारूच्या दुकानातील अबकारी विभागाने साठा चेक करून सील लावले होते. परंतु काही लालसी बियरबार व देशी दारू दुकानदारांद्वारा अबकारी विभागातील एका अधिकाऱ्याला पकडून सील लावलेल्या बार व देशी दारूच्या दुकानातून राजरोसपणे इंग्लिश व देशी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात होती.

दीड महिन्यात बहुतांश बियरबार व देशी दारूच्या दुकानातील दारू विक्री करून संपविण्यात आली. तर मुकूटबन येथ एका भट्टीचा परवाना सुद्धा रद्द करण्यात आला. अबकारी विभागाच्या आशीर्वादानेच दुकानाचे सील तोडून दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली आहे. या संपूर्ण प्रकारात तालुक्यातील एकाही बारचालकावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

प्रातिनिधिक फोटो

लॉकडाऊनमध्ये देशी दारू दुकान व बियरबार मधील संपूर्ण दारू विक्री करण्यात आल्याची ओरड संपूर्ण जिल्ह्यात होती. याच अनुषंगाने शासनाने संपूर्ण बियरबार मधील साठ्याती तफावत तपासणीचे तसेच बियरबार मधील उर्वरित मालाची विक्री प्रिंट रेटने करण्याचे आदेश दिले.

साठ्यात तफावत आढळल्यास परवाना रद्दची कार्यावही होणार असल्याची माहिती आहे. याच अनुषंगाने अबकारी विभागाचे भटकर यांनी झरी तालुक्यातील मुकूटबन व झरी येथील बियरबारची तपासणी केली असता सर्वच बार मध्ये साठ्यात तफावत असल्याचे निदर्शनात आले. याबाबत चे वृत्त वणी बहुगुणीने प्रकाशित करताच सर्वच बियरबार मालकाचे झोप उडाली असून आपले बार कसे वाचवता येईल याकरिता धावपळ सुरू झाली आहे.

निरीक्षक भटकर यांच्या तपासणी नुसार सर्वच बार मध्ये तफावतआढळल्याने बहुतांश बियरबारचे परवाने रद्द होणार अशी चर्चा तालुक्यात सुरू असून निरीक्षक भटकर जिल्हाधिकारी यांच्याकडे कसा  अहवाल पाठवितात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.